IPL 2025 Start Date Likely to be Changed: इंडियन प्रीमियर लीगचा १८ वा सीझन म्हणजेच आयपीएल २०२५ मार्चमध्ये सुरू होणार आहे. पण बीसीसीआयकडून अद्याप अधिकृत वेळापत्रकाची घोषणा करण्यात आलेली नाही. पण आयपीएल २०२५ मार्चच्या तिसऱ्या आठवड्यात सुरू होऊ शकते. या वेळी सर्व १० संघांमध्ये अनेक मोठे बदल पाहायला मिळतील, ज्यामध्ये एकाच संघाकडून दीर्घकाळ खेळणारे अनेक खेळाडू इतर संघांच्या जर्सीमध्ये दिसणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आयपीएलच्या १८ व्या हंगामासंबंधित क्रिकबझच्या अहवालानुसार, २२ मार्चपासून आयपीएल सुरू होऊ शकते. ज्याची सुरुवात गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या संघापासून होईल. लीगच्या प्रथेनुसार, हा सलामीचा सामना गतविजेत्या संघाच्या घरच्या मैदानावर म्हणजेच कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर खेळवला जाईल. तर २५ मे रोजी कोलकाता येथील ईडन गार्डन्स स्टेडियमवर अंतिम सामना खेळवला जाऊ शकतो.

IPL 2025 च्या सुरुवातीसंदर्भात क्रिकबझवरील बातमीनुसार, आगामी हंगामातील पहिला सामना २२ मार्च रोजी गतविजेता कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळवला जाऊ शकतो. दुसरा सामना गत मोसमातील उपविजेता सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात २३ मार्च रोजी हैदराबाद संघाच्या घरच्या मैदानावर होणार आहे. बीसीसीआयने अद्याप अधिकृत वेळापत्रक जाहीर केले नसले तरी सर्व फ्रँचायझींना त्यांच्या महत्त्वाच्या सामन्यांच्या तारखांची माहिती देण्यात आली आहे.

१२ जानेवारी रोजी झालेल्या बीसीसीआयच्या विशेष सर्वसाधारण सभेनंतर राजीव शुक्ला यांनी २३ मार्चपासून आयपीएल सुरू होणार असल्याचे संकेत दिले होते. पण आता बीसीसीआयने तारीख बदलून एक दिवस आधी स्पर्धा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्याचे लवकरच संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले जाईल.

आगामी आयपीएल हंगामातील सर्व सामने फ्रँचायझींच्या घरच्या मैदानावर खेळवले जाती. याशिवाय, क्रिकबझच्या अहवालानुसार, गुवाहाटी आणि धरमशाला येथेही सामने खेळवले जातील. राजस्थान रॉयल्स संघासाठी गेल्या काही हंगामात गुवाहाटी हे त्यांचे घरचे मैदान बनले आहे, तर पंजाब किंग्ज मुल्लानपूर व्यतिरिक्त धरमशाला स्टेडियममध्ये काही सामने खेळतो. यावेळी, स्पर्धेतील क्वालिफायर-१ आणि एलिमिनेटर सामने हैदराबादमध्ये खेळवले जातील, तर क्वालिफायर-२ आणि अंतिम सामने कोलकात्याच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळवले जातील.