JioHotstar Merger IPL 2025 Online Streaming Paid: आयपीएलचे सामने म्हणजे क्रिकेट चाहत्यांसाठी एक सोहळा असतो. भारतासह इतर सर्वच देशांचे खेळाडू वेगवेगळ्या १० संघांमधून खेळत असतात. मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या आणि अशा सर्वच संघाचे चाहते सामने पाहण्यासाठी उत्सुक असतात. यापूर्वी आयपीएल सामन्यांचं लाईव्ह स्ट्रीमिंग मोफत पाहायला मिळत असे. पण आता तसं होणार नाही…
क्रिकेट चाहते आयपीएलच्या मागील हंगामापर्यंत या लीगमध्ये खेळल्या जाणाऱ्या सामन्यांचे विनामूल्य लाइव्ह स्ट्रीमिंग पाहायचे पण आता यात बदल होणार आहे. आता Viacom18 आणि Star India यांचे विलीनीकरण झाले आहे आणि आता जियोहॉटस्टार (JioHotstar) हा नवा अॅप सर्वांच्या भेटीला आला आहे. आता चाहत्यांना JioHotstar वर IPL सामन्यांचा मोफत आनंद घेता येणार नाही आणि त्यासाठी त्यांना पैसे खर्च करावे लागतील.
जियो सिनेमा और डिज्नी प्लस हॉटस्टार या दोन्ही स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मच्या विलीनीकरणानंतर, शुक्रवारी नवीन स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म JioHotstar लाँच करण्यात आले. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, चाहत्यांना आता सदस्यत्वाशिवाय आयपीएलचे लाईव्ह स्ट्रीमिंग काही मिनिटेच सामने पाहता येणार आहेत. मोफत सामन्याची वेळ संपल्यानंतर चाहत्यांना सबस्क्रिप्शनचा मेसेज पुन्हा स्क्रिनवर दिसेल.
आयपीएल २०२५च्या सामन्यांचं संपूर्ण लाईव्ह स्ट्रीमिंग पाहण्यासाठी आता सबस्क्रिप्शन घ्यावं लागणार आहे आणि या सबस्क्रिप्शन पॅकची सुरूवात १४९ रूपयांपासून सुरू होत आहे. जियो सिनेमाने २०२३ मध्ये IPL लाइव्ह स्ट्रीमिंगचे अधिकार विकत घेतले होते आणि त्यासाठी ३ बिलियनचा व्यवहार केला होता.
यानंतर, Jio Cinema वर २०२३ आणि २०२४ मध्ये चाहत्यांना मोफत सामने पाहता आले, पण या सीझनपासून चाहत्यांना संपूर्ण सामना पाहण्यासाठी त्यांच्या गरजेनुसार पैसे द्यावे लागतील. मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स आणि वॉल्ट डिस्ने यांचे विलीनीकरण झाल्यावर जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट लीग IPL च्या स्ट्रीमिंग अटी बदलण्याचा निर्णय घेण्यात आला.
एका सूत्राने सांगितले की एकदा वापरकर्त्याने प्लॅटफॉर्म विनामूल्य पाहणे सुरू केले की ते निष्ठावान बनतात… मग सदस्यत्व सुरू होते. त्यांनी पुढे स्पष्ट केले की प्रत्येक युजरचे सदस्यत्व वेगवेगळ्या वेळी सुरू होऊ शकते, म्हणजे प्रत्येकजण आपल्या गरजेनुसार पॅक घेऊ शकतो आणि नंतर सामन्याचा आनंद घेऊ शकतो.
JioHotstarचे नवे सबस्क्रिप्शन प्लॅन काय आहेत?
Jio Hotstar सबस्क्रिप्शन प्लॅन १४९ रुपयांपासून सुरू होईल आणि तीन महिन्यांसाठी ४९९ रूपयांचा पॅक घ्यावा लागेल. १४९ रुपयांचा प्लान बेसिक असेल ज्यामध्ये चाहत्यांना फक्त काही सामने पाहता येतील.
JioHotstar हे ICC इव्हेंट, IPL आणि WPL सारख्या प्रमुख स्पर्धांचे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहण्याचं हक्काचं ठिकाण आहे. हे इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगसह तळागाळातील क्रिकेट आणि BCCI, ICC आणि इतर कार्यक्रमांचे लाईव्ह स्ट्रीमिंगही दाखवते. क्रिकेटच्या पलीकडे, प्रो कबड्डी आणि आयएसएलसारख्या देशांतर्गत लीगला शक्ती देता तसेच प्रीमियर लीग आणि विम्बल्डनसह जागतिक क्रीडा स्पर्धादेखील पाहायला मिळतात.