IPL 2025 Auction: आयपीएल २०२५ पूर्वी मेगा लिलाव होणार आहे. या लिलावाआधी रिटेंशनचे काही नवीन नियम आयपीएल काऊन्सिलने जाहीर केले होते, त्याप्रमाणे संघ ५ खेळाडूंना रिटेन करू शकतात तर राईट टू मॅच कार्डअंतर्गत सहावा खेळाडूही रिटेन केल्यास त्यांना लिलावादरम्यान हे कार्ड वापरता येणार नाही. त्याचबरोबर येत्या ३१ ऑक्टोबरपर्यंत रिलीज आणि रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी संघांना जाहीर करायची आहे. यंदा फ्रँचायझी मोठ्या खेळाडूंना लिलावापूर्वी रिलीज करू शकतात, अशी चर्चा आहे. हे खेळाडू आहेत कोण जाणून घेऊया.

केएल राहुल – लखनौ सुपर जायंट्स

IND vs NZ Harshit Rana called up to India Test squad, likely to make debut in Mumbai against New Zealand Mumbai Test
IND vs NZ: मुंबई कसोटीपूर्वी टीम इंडियात मोठा बदल, या वेगवान गोलंदाजाची भारतीय संघात होणार एन्ट्री, पदार्पणाची मिळणार संधी
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
IPL 2025 Retention CSK Announce Retained Players With Riddle of 5 Names see Cryptic Social Media Post
IPL 2025 Retention: हेलिकॉप्टर, किवी…; CSKने दिली मोठी हिंट, जाहीर केली रिटेन खेळाडूंची यादी? पाहा कोण आहेत ‘हे’ ५ खेळाडू
Cricket At Olympic 2028 Likely To be Moved Out of Los Angeles to maximise viewership in India
Olympic 2028: भारतामुळे Olympic 2028 मधील क्रिकेट सामने लॉस एंजेलिसमध्ये होणार नाहीत? वाचा कारण
Virat Kohli Blocked Glenn Maxwell on Instagram in 2021 What is The Reason IPL 2025
Virat Kohli-Maxwell: “विराट कोहलीने मला इन्स्टाग्रामवर ब्लॉक केलं होतं…”, मॅक्सवेलने केला मोठा खुलासा, मैदानावरील त्या प्रकरणामुळे भडकलेल्या विराटने…
IPL 2025 MI Retention Team Players List
MI IPL 2025 Retention: रोहित-सूर्या-हार्दिक-बुमराह रिटेन, बुमराहला सर्वाधिक रिटेंशन किंमत
Rohit Sharma Statement After Being Retained by Mumbai Indians for less than what Jasprit Bumrah and Hardik Pandya got
Rohit Sharma: “मी निवृत्ती घेतल्यानंतर या क्रमांकावर…”, रोहित शर्माने सूर्या-हार्दिकपेक्षा कमी रिटेंशन किंमत मिळाल्यानंतर केले मोठे वक्तव्य, पाहा VIDEO
IPL 2025 Players Retention Highlights in Marathi| IPL 2025 Retained & Released Players List Squad
IPL 2025 Retention Highlights : हेनरिक क्लासेन ठरला रिटेन्शन यादीतील सर्वात महागडा खेळाडू! धोनी चेन्नईकडे तर रोहित मुंबईकडे कायम

२०२२ च्या लिलावात लखनऊ सुपर जायंट्सने यष्टीरक्षक फलंदाज के एल राहुल याला १८ कोटी रुपये खर्चून संघात सामील केले होते. के एल राहुलच्या नेतृत्वाखाली संघ दोनदा प्ले ऑफ मध्ये पोहोचण्यात यशस्वी ठरला. पण आता लखनौचा संघ आयपीएल २०२५ पूर्वी त्याला रिलीज करणार आहे अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. केल राहुल ऐवजी लखनौचा संघ मयांक यादव, आयुष बदोनी, रवी बिश्नोई, निकोलस पुरन यासारख्या खेळाडूंना रिटेन करण्याची शक्यता जास्त आहे. के एल राहुलने ३८ आयपीएल सामन्यांमध्ये १४१० धावा केल्या आहेत, ज्यामध्ये दोन शतकांचा समावेश आहे. त्याचबरोबर २०२२ मध्ये लखनौ संघात सामील झाल्यानंतर आयपीएल २०२२ मधील सर्वाधिक धावा करणारा खेळाडू म्हणून दुसऱ्या स्थानी होता तर २०२३ च्या हंगामात दुखापतीमुळे त्याला बाहेर राहावे लागले. २०२४ मधील त्याची कामगिरी आणि त्याचा स्ट्राईक रेटवरून होणारी चर्चा पाहता यंदा लखनौचा संघ त्याला रिलीज करण्याची शक्यता अधिक आहे.

हेही वाचा – IND vs NZ: “सचिन तेंडुलकर ४० व्या वर्षी…”, न्यूझीलंडविरूद्ध अपयशी ठरलेल्या रोहित-विराटला सचिनचं उदाहरण देत चाहत्यांचा तिखट सवाल

श्रेयस अय्यर – कोलकाता नाईट रायडर्स

श्रेयस सय्यरच्या नेतृत्वाखाली २०२४ मध्ये कोलकता नाईट रायडर्स संघ पुन्हा एकदा आयपीएल चॅम्पियन ठरला. कर्णधार श्रेयस अय्यरने २०२४ च्या हंगामात १४ डावांमध्ये ३५१ धावा केल्या होत्या. पण तरीही श्रेयस अय्यर आगामी आयपीएल मोसमात दुसऱ्या संघाकडून खेळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याचबरोबर कोलकता संघामध्ये अनेक विदेशी खेळाडू आहेत, ज्यांना संघ रिटेन करू शकतो. ज्यामध्ये फिल सॉल्ट, सुनील नारायण, आंद्रे रसेल आणि मिचेल स्टार्क यांच्या नावाचा समावेश आहे. तर भारतीय खेळाडूंचा विचार करता कोलकताचा संघ रिंकू सिंग आणि हर्षित राणा या खेळाडूंना रिटेन करू शकतात.

हेही वाचा – IPL 2025 Auction: KL Rahul नाही तर या ५ खेळाडूंना रिटेन करणार लखनौ सुपर जायंट्स, २ अनकॅप्ड खेळाडूंचाही समावेश

ऋषभ पंत – दिल्ली कॅपिटल्स

ऋषभ पंत हा त्याच्या आयपीएल करिअरच्या सुरुवातीपासूनच दिल्ली कॅपिटल्स संघाचा भाग राहिला आहे. पण आता आगामी मोसमामध्ये तो दुसऱ्या संघाकडून खेळू शकतो असे अनेक अहवालांमध्ये म्हटले गेले आहे. पाच वेळा आयपीएल चॅम्पियन असलेल्या चेन्नई सुपर किंग्स संघ ऋषभ पंतला आपल्या संघात सामील करू शकतात. धोनीच्या आयपीएल निवृत्तीनंतर ऋषभ पंत हा त्याच्याजागी बदली खेळाडू म्हणून एक योग्य पर्याय ठरू शकतो. सीएसके बरोबरच लखनौ आणि कोलकता संघ देखील कर्णधार म्हणून भारतीय खेळाडू या उद्देशाने त्याला आपल्या संघामध्ये सामील करू शकतात.

हेही वाचा – ऑस्ट्रेलियाला टी-२० विश्वचषक पटकावून देणाऱ्या खेळाडूने अचानक निवृत्तीची केली घोषणा, पाकिस्तानविरूद्ध मालिकेत प्रशिक्षकाच्या भूमिकेत

पॅट कमिन्स – सनरायझर्स हैदराबाद

सनरायझर्स हैदराबादचा संघ आयपीएल २०२४ च्या अंतिम फेरी पोहोचण्यामागे पॅट कमिन्स आणि त्याचे नेतृत्व हे महत्त्वाचे पैलू होते. पण येत्या सीजनमध्ये संघ कमिन्सऐवजी त्यांच्या इतर दोन विदेशी खेळाडूंना रिटेन करू शकतात ते म्हणजे ट्रॅव्हिस हेड आणि हेनरिक क्लासेन. हे दोघेही हैदराबाद संघाच्या फलंदाजीची मुख्य बाजू आहे, याचा प्रत्यय आपण गेल्या मोसमात संघाने आयपीएल इतिहासात उभारलेल्या सर्वाधिक मोठ्या धावसंख्येच्या रूपामध्ये पाहिला आहे. विदेशी खेळाडूंबरोबरच हैदराबादचा संघ अभिषेक शर्मा आणि नितेश कुमार रेड्डी या भारतीय खेळाडूंना रिटेन करू शकतो. याचबरोबर हैदराबादचा संघ पॅट कमिन्सला संघात कायम ठेवण्यासाठी राईट टू मॅच कार्ड ही वापरू शकतात. आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर सर्वाधिक लक्ष देण्यासाठी कमिन्सने यापूर्वी आयपीएलमध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला होता, २०२५ मध्ये होणाऱ्या अॅशेस मालिकेचा विचार करता कमिन्स काय निर्णय घेणार यावर ही संघाची रिटेंशन रणनीती अवलंबून असेल.

फाफ डू प्लेसिस – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू

रॉयल चॅलेंजेर्स बंगळुरूचा संघ त्यांचा कर्णधार फाफ डू प्लेसिस याला रिलीज करण्याची शक्यता आहे आणि त्याचं महत्त्वाचं कारण असेल ते म्हणजे फाफचे वय. वयाच्या ४०व्या वर्षी डु प्लेसिस अजूनही जगभरातील विविध टी-ट्वेंटी लीग मध्ये खेळतो, पण संघाचे भविष्य पाहता फ्रँचाईजी यंदा त्याला रिटेन न करण्याची शक्यता आहे. याशिवाय बंगळुरूच्या संघामध्ये ग्लेन मॅक्सवेल, विल जॅक्स, कॅमरून ग्रीन सारखे विदेशी खेळाडू ही आहेत.