IPL 2025 Retention CSK Shared Cryptic Post with: आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावापूर्वी सर्व १० संघांना रिटेन आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी ३१ ऑक्टोबरपूर्वी जाहीर करायची आहे. सर्वाधिक प्रसिद्ध संघांमधील कोणत्या खेळाडूंना रिटेन करणार आणि कोणाला रिलीज करणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे. यादरम्यान चेन्नई सुपर किंग्सने एक क्रिप्टीक पोस्ट करत कोणत्या खेळाडूंना संघ रिचेटेन करणार आहे, याचे संकेत दिले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावापूर्वी संघांना ५ खेळाडूंना रिटेन करण्याची संधी आहे. त्यांच्यामध्ये ४ कॅप्ड खेळाडू असू शकतात, तर एक अनकॅप्ड खेळाडू असेल. जर संघाला दोन अनकॅप्ड खेळाडू हवे असतील तर फक्त चार कॅप्ड खेळाडू निवडता येतील. तर राईट टू मॅच अंतर्गत अजून एका खेळाडूला रिटेन करता येऊ शकते किंवा ते कार्ड एखाद्या खेळाडूला रिटेन करता येईल. दरम्यान, CSK ने त्याच्या एक्स चाहत्यांसह काही इमोजीसह एक क्रिप्टीक पोस्ट शेअर केली आहे आणि कोणत्या खेळाडूंना रिटेन करणार हे सांगितले आहे. इमोजी पाहता संघ पाच खेळाडूंना कायम ठेवणार आहे.

हेही वाचा – Smriti Mandhana: स्मृती मानधनाने न्यूझीलंडविरूद्ध शतक झळकावत केला मोठा पराक्रम, वनडेमध्ये ही कामगिरी करणारी ठरली पहिली महिला फलंदाज

चेन्नई सुपर किंग्स संघाने शेअर केलेल्या या फोटोवर चाहत्यांनी अनेक कमेंट्स करत हे खेळाडू कोण आहेत, हे सांगितले आहेत. चाहत्यांनी संघ कोणत्या खेळाडूंना कायम ठेवू शकतो याचा अंदाज लावण्याचा प्रयत्न केला आहे. ऋतुराज गायकवाड, रवींद्र जडेजा, मथिशा पाथिराना, एमएस धोनी आणि रचिन रवींद्र यांना संघ कायम ठेवणार असल्याचा अंदाज बहुतेक चाहत्यांनी व्यक्त केला आहे. चेन्नईने शेअर केलेल्या इमोजींमध्ये हेलिकॉप्टर, कोणाकडे किवी तर काहींकडे घोडा आणि तलवार आहे. त्यामुळेच हे खेळाडू धोनी, जडेजा, गायकवाड, पाथिराना आणि रचिन रवींद्र हे खेळाडू असल्याचा अंदाज चाहते बांधत आहेत.

हेही वाचा – IPL 2025 Auction: ऋषभ पंत, श्रेयस अय्यर ते केएल राहुल… ‘या’ ५ मोठ्या खेळाडूंना संघ करू शकतात रिलीज, काय आहे कारण?

पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे अशीच एक पोस्ट CSK ने २०२१ च्या मेगा लिलावापूर्वी अशाच इमोजीसह केली होती. मात्र, त्यावेळी सीएसकेने रवींद्र जडेजा, एमएस धोनी, मोईन अली आणि ऋतुराज गायकवाड यांना रिटेन केले होते. आता पुन्हा तीच पोस्ट त्यांनी केली असल्याने त्यात तथ्य नसल्याचे बोलले जात आहे. ॲडमिनने जुनी पोस्ट कॉपी पेस्ट केली आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2025 retention csk announce retained players with riddle of 5 names see cryptic social media post bdg