IPL 2025 Retention Chennai Super Kings Team Players: पाच वेळचा आयपीएल चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्स संघामध्ये अनेक स्टार आणि दिग्गज खेळाडू आहेत. तर नवे युवा खेळाडू काही कमी नाहीत. त्यामुळे संघ कोणत्या खेळाडूंना रिटेन करणार याची उत्सुकता फारच होती. पण चेन्नई सुपर किंग्स संघाने रिटेंशनच्या डेडलाईनपूर्वी एक दिवस आधी एक क्रिप्टिक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये सीएसकेने काही इमोजी टाकत एक कोडं टाकलं ज्यामध्ये जणू काही रिटेन केलेल्या खेळाडूंची नाव लपली होती. या कोड्यावरून संघ कोणत्या खेळाडूंना रिटेन करणार याचा चाहत्यांनी अंदाज लावला.

चेन्नई सुपर किंग्सने पाच ते सहा खेळाडूंची नाव त्यात लपली आहेत अशी एक पोस्ट शेअर केली. ज्यात हेलिकॉप्टर, किवी, तलवारी, सिंह असे अनेक इमोजी होते. त्यावरून चाहत्यांनी योग्य निकष लावल्याप्रमाणे संघाने ऋतुराज गायकवाड, रवींद्र जडेजा, मथिशा पाथिराना, एमएस धोनी आणि शिवम दुबे यांना रिटेन करण्यात आले आहे. याक ऋतुराज आणि जडेजाला सर्वाधिक १८ कोटी रिटेंशन किंमत आहे तर आता धोनी अनकॅप्ड म्हणून खेळणार असून त्याला ४ कोटी किंमत आहे.

IPL 2025 MI Retention Team Players List
MI IPL 2025 Retention: रोहित-सूर्या-हार्दिक-बुमराह रिटेन, बुमराहला सर्वाधिक रिटेंशन किंमत
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
IPL 2025 DC Retention Team Players List
DC IPL 2025 Retention: ऋषभ पंत दिल्लीच्या ताफ्यातून रिलीज, अक्षर पटेलला मोठी रक्कम
IPL 2025 SRH Retention Team Players List
SRH IPL 2025 Retention: सर्वात मोठी रक्कम! हेनरिक क्लासेनला २३ कोटींमध्ये केलं रिटेन, हैदराबादने भुवनेश्वर कुमारला केलं रिलीज
IPL 2025 RCB Retention Team Players List
RCB IPL 2025 Retention: आरसीबीने फक्त ३ खेळाडूंना केलं रिटेन, विराट कोहलीला तब्बल २१ कोटींना केलं रिटेन
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
IPL 2025 PBKS Retention Team Players List
PBKS IPL 2025 Retention: पंजाब किंग्ज संघाचा होणार कायापालट, लिलावात चुकून घेतलेल्या खेळाडूसह फक्त एकाला केलं रिटेन
IPL 2025 Players Retention Highlights in Marathi| IPL 2025 Retained & Released Players List Squad
IPL 2025 Retention Highlights : हेनरिक क्लासेन ठरला रिटेन्शन यादीतील सर्वात महागडा खेळाडू! धोनी चेन्नईकडे तर रोहित मुंबईकडे कायम

हेही वाचा – IPL 2025 Retention: हेलिकॉप्टर, किवी…; CSKने दिली मोठी हिंट, जाहीर केली रिटेन खेळाडूंची यादी? पाहा कोण आहेत ‘हे’ ५ खेळाडू

याचबरोबर संघात अनेक किवी खेळाडू होते. किवी खेळाडूंचा आयपीएल संघ म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. रचिन रवींद्र, मिचेल सँटनर, डॅरिल मिचेल आणि डेव्हॉन कॉन्वे हे किवी खेळाडू आहेत. पण चेन्नईने एकाही किवी खेळाडूला रिटेन केलेलं नाही.

CSK Retained Players: रिटेन केलेले खेळाडू

ऋतुराज गायकवाड – १८ कोटी
रवींद्र जडेजा – १८ कोटी
महेंद्रसिंग धोनी – ४ कोटी
मथिशा पथिराणा – १३ कोटी
शिवम दुबे – १२ कोटी

रिलीज केलेले खेळाडू

अरावेली अवनीश, अजिंक्य रहाणे, शाईक रशीद, समीर रिझवी, डेव्हॉन कॉनवे, मोईन अली, राजवर्धन हंगारगेकर, अजय मोंडल, डॅरेल मिचेल, मिचेल सँटनर, निशांत सिंधू, दीपक चहर, तुषार देशपांडे, रिचर्ड ग्लीसन, मुकेश चौधरी, मुस्ताफिझूर रहमान, सिमरजीत सिंग, प्रशांत सोळंकी, महीश तीक्षणा

Story img Loader