IPL 2025 Retention Chennai Super Kings Team Players: पाच वेळचा आयपीएल चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्स संघामध्ये अनेक स्टार आणि दिग्गज खेळाडू आहेत. तर नवे युवा खेळाडू काही कमी नाहीत. त्यामुळे संघ कोणत्या खेळाडूंना रिटेन करणार याची उत्सुकता फारच आहे. पण चेन्नई सुपर किंग्स संघाने रिटेंशनच्या डेडलाईनपूर्वी एक दिवस आधी एक क्रिप्टिक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये सीएसकेने काही इमोजी टाकत एक कोडं टाकलं ज्यामध्ये जणू काही रिटेन केलेल्या खेळाडूंची नाव लपली होती. या कोड्यावरून संघ कोणत्या खेळाडूंना रिटेन करणार याचा चाहत्यांनी अंदाज लावला.

चेन्नई सुपर किंग्सने पाच ते सहा खेळाडूंची नाव त्यात लपली आहेत अशी एक पोस्ट शेअर केली. ज्यात हेलिकॉप्टर, किवी, तलवारी, सिंह असे अनेक इमोजी आहेत. यावरून चेन्नईच्या रिटेन करण्यात येणाऱ्या खेळाडूंची नाव चाहत्यांनी मात्र सांगितली आहेत. यामध्ये ऋतुराज गायकवाड, रवींद्र जडेजा, मथिशा पाथिराना, एमएस धोनी आणि रचिन रवींद्र यांना संघ कायम ठेवणार असल्याचा अंदाज बहुतेक चाहत्यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा – IPL 2025 Retention: हेलिकॉप्टर, किवी…; CSKने दिली मोठी हिंट, जाहीर केली रिटेन खेळाडूंची यादी? पाहा कोण आहेत ‘हे’ ५ खेळाडू

चेन्नई सुपर किंग्सचा संघ अनकॅप्ड खेळाडू म्हणून एम एस धोनीला तर कॅप्ड खेळाडूंमध्ये ऋतुराज गायकवाड, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, मथिशा पथिराना यांना रिटेन करू शकतात. याचबरोबर संघात अनेक किवी खेळाडू आहेत. किवी खेळाडूंचा आयपीएल संघ म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. रचिन रवींद्र, मिचेल सँटनर, डॅरिल मिचेल आणि डेव्हॉन कॉन्वे हे किवी खेळाडू आहेत. त्यापैकी संघ कोणत्या खेळाडूला राईट टू मॅच कार्ड वापरणार यावर सर्वांच्या नजरा आहेत.