IPL 2025 Retention Delhi Capitals Team Players: आयपीएल रिटेन्शनमधील सगळ्यात चर्चित नाव म्हणजे विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत. ऋषभची आयपीएल कारकीर्द या संघाच्या माध्यमातूनच उभी राहिली आहे. पण आता मात्र दिल्ली संघाने ऋषभ पंतला संघातून रिलीज केलं आहे, जी मोठी बातमी आहे. अशारितीने गेले काही दिवस त्याला संघातून रिलीज करण्यात येईल ही चर्चा खरी ठरली आहे. महेंद्रसिंग धोनीचा वारसदार या दृष्टीने पंतकडे पाहिलं जातं. जीवघेण्या अपघातातून सावरत दमदार पुनरागमन करणाऱ्या ऋषभने चाहत्यांची मने जिंकली आहेत. तडाखेबंद फटकेबाजी आणि उत्तम यष्टीरक्षण ही पंतची जमेची बाजू. या दोन्हीच्या बरोबरीने कर्णधारपदही भूषवत असल्याने ऋषभ हा आयपीएल मार्केटमधलं चलनी नाणं आहे. ऋषभला केंद्रस्थानी ठेऊनच अनेक वर्ष दिल्लीने संघरचना केली होती. मात्र आता दिल्ली संघव्यवस्थापनात मूलभूत बदल झाले आहेत. रिकी पॉन्टिंग, सौरव गांगुली यांच्याऐवजी हेमांग बदानी आणि वेणूगोपाळ राव यांनी कार्यभार स्वीकारला आहे. ऋषभने काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर पोस्ट करून मला लिलावात किती रक्कम मिळेल असं म्हटलं होतं. त्यानंतर उलटसुलट चर्चांना उधाण आलं होतं. पंतसाठी अनेक संघ उत्सुक आहेत. ऋषभचं वय आणि क्षमता पाहता त्याच्यासारखा खेळाडू ताफ्यात असणं कोणत्याही संघासाठी फायदेशीर सौदा आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा