IPL 2025 Retention Gujarat Titans Team Players: गुजरात टायटन्सने अपेक्षित अशा खेळाडूंना रिटेन केले आहे. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात गुजरात टायटन्स संघाने पदार्पणाच्या हंगामातच जेतेपद पटकावण्याची किमया केली. दुसऱ्या हंगामातही त्यांनी सातत्यपूर्ण खेळ करत अंतिम फेरीत धडक मारली. मात्र महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सने त्यांच्यापासून जेतेपद हिरावलं. हार्दिक पंड्याला केंद्रस्थानी ठेऊन गुजरातने संघाची बांधणी केली होती. मात्र मुंबई इंडियन्स संघाने हार्दिकला ट्रेडऑफमध्ये आपल्याकडे समाविष्ट केलं.
हेही वाचा – KKR IPL 2025 Retention: जेतेपद मिळवून देणाऱ्याला कर्णधाराला केकेआर सोडणार?
हार्दिक बाजूला झाल्यानंतर शुबमन गिल गुजरातचा कर्णधार झाला. सातत्याने विकेट्स पटकावणं आणि धावांची गती रोखणं यामध्ये रशीद खान निपुण आहे. संघाने रशीद खानला ताफ्यात राखत सर्वाधिक किंमत दिली आहे. जेतेपद मिळवून देण्यात फिनिशरची भूमिका बजावणारा डेव्हिड मिलरला मात्र संघाने रामराम ठोकला आहे. मोहम्मद शमीची दुखापत लक्षात घेता संघाने त्याला रिलीज केलं आहे. याचबरोबर कर्णधार शुबमन गिल, उत्कृष्ट फलंदाज साई सुदर्शन, राहुल तेवतिया आणि शाहरुख खान यांना रिटेन केलं आहे.
GT Retained Players: रिटेन केलेले खेळाडू
रशीद खान – १८ कोटी
शुबमन गिल – १६.५० कोटी
साई सुदर्शन – ८.५० कोटी
राहुल तेवतिया – ४ कोटी
शाहरूख खान – ४ कोटी
रिलीज केलेले खेळाडू
गुजरात टायटन्स- वृद्धिमान साहा, शाहरुख खान, बी.एस.शरथ, मॅथ्यू वेड, केन विल्यमसन, रॉबिन मिन्झ, अझमतुल्ला ओमरझाई, अभिनव मनोहर, विजय शंकर, मानव सुतार, राहुल टेवाटिया, गुरनूर ब्रार, स्पेन्सर जॉन्सन, जोशुआ लिटिल, कार्तिक त्यागी, दर्शन नालकांडे, नूर अहमद, साई किशोर, संदीप वॉरियर, मोहित शर्मा, जयंत यादव, उमेश यादव, मोहम्मद शमी.