IPL 2025 Retention Gujarat Titans Team Players: हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात गुजरात टायटन्स संघाने पदार्पणाच्या हंगामातच जेतेपद पटकावण्याची किमया केली. दुसऱ्या हंगामातही त्यांनी सातत्यपूर्ण खेळ करत अंतिम फेरीत धडक मारली. मात्र महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सने त्यांच्यापासून जेतेपद हिरावलं. हार्दिक पंड्याला केंद्रस्थानी ठेऊन गुजरातने संघाची बांधणी केली होती. मात्र मुंबई इंडियन्स संघाने हार्दिकला ट्रेडऑफमध्ये आपल्याकडे समाविष्ट केलं.
हेही वाचा – KKR IPL 2025 Retention: जेतेपद मिळवून देणाऱ्याला कर्णधाराला केकेआर सोडणार?
हार्दिक बाजूला झाल्यानंतर शुबमन गिल गुजरातचा कर्णधार झाला. सातत्याने विकेट्स पटकावणं आणि धावांची गती रोखणं यामध्ये रशीद खान निपुण आहे. रशीद खानला ताफ्यात राखण्यासाठी गुजरात आतूर आहे. जेतेपद मिळवून देण्यात फिनिशरची भूमिका बजावणारा डेव्हिड मिलर निर्णायक ठरला होता. मिलरसाठी गुजरात प्रयत्नशील आहे. दुखापतींची शक्यता आणि वय लक्षात घेऊन मोहम्मद शमी किती हंगाम खेळू शकेल याबाबत साशंकता आहे.