IPL 2025 retention Irfan Pathan lauds BCCI : भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणने बीसीसीआयचे कौतुक केले आहे. कारण बीसीसीआयने आयपीएल २०२५ साठी एका असा नियम लागू केला आहे. जर एखाद्या विदेशी खेळाडूला फ्रँचायझीने खरेदी केले आणि तो हंगामापूर्वी स्पर्धेसाठी उपलब्ध नसेल, तर त्याच्यावर बंदी घातली जाईल. त्याच्यावर केवळ त्या हंगामापुरती नव्हे तर दोन हंगामांसाठी बंदी घालण्यात येणार आहे. कारण अनेकदा विदेशी खेळाडू असे करतात आणि वैयक्तिक कारणे सांगतात. त्यामुळे हंगाम सुरू होण्यापूर्वी वैयक्तिक कारणांमुळे विदेशी खेळाडूंना अनुपलब्ध केल्याने आयपीएल फ्रँचायझी खूश नव्हत्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इरफान पठाणकडून बीसीसीआयचे कौतुक –

त्यामुळे फ्रँचायझींनी सांगितले होते की याचा त्यांच्या कामगिरीवरही परिणाम होतो. कारण संघाची रणनीती त्या विदेशी खेळाडूंना लक्षात घेऊन बनवली जाते. इरफान पठाणने त्याच्या एक्स अकाउंटवर लिहिले की, “मी गेल्या दोन वर्षांपासून याबद्दल बोलत आहे. बीसीसीआयने घेतलेला निर्णय पाहून आनंद झाला! लिलावात निवड झाल्यानंतर त्यांची अनुपलब्धता जाहीर करणाऱ्या खेळाडूंवर आता दोन वर्षांची बंदी घालण्यात येणार आहे. आयपीएल अनेक प्रकारे मजबूत होत आहे.”

विदेशी खेळाडूंवर दोन वर्ष बंदी घालण्याचा निर्णय –

बीसीसीआयने शनिवार, २८ सप्टेंबर रोजी आयपीएल २०२५ च्या मोठ्या लिलावाबाबत एक प्रेस रिलीज जारी केली. ज्यामध्ये आयपीएल गव्हर्निंग काऊंसिलच्या बैठकीत घेण्यात आलेले ८ प्रमुख निर्णयाबाबत माहिती दिली. आयपीएल २०२५ पूर्वी होणाऱ्या मोठ्या लिलावापूर्वी फ्रँचायझींना ६ खेळाडूंना कायम ठेवता येणार आहे. ते एका खेळाडूवर १८ कोटी रुपये खर्च करू शकता. या मुद्द्यांमध्ये, हे देखील सांगण्यात आले की जर एखाद्या खेळाडूने मोठ्या लिलावासाठी मुद्धाम नोंदणी केली नाही, तर त्याला पुढील छोट्या लिलावात सामील केले जाणार नाही. कारण जेणेकरून या खेळाडूंना त्यांच्या सोयीनुसार मोठी रक्कम मिळण्याच्या आशेने छोट्या लिलावात सहभागी होता येणार नाही.

हेही वाचा – IPL 2025 : चेन्नई सुपर किंग्जसह ‘या’ तीन फ्रँचायझींना होणाार ‘अनकॅप्ड प्लेयर्स’च्या नवीन नियमाचा फायदा

फ्रँचायझींनी आयपीएल गव्हर्निंग काऊंसिलला असेही सांगितले होते की गेल्या दोन लिलावाच्या (२०१८-२४) दरम्यान अशा अनेक घटना घडल्या आहेत. जेव्हा काही परदेशी खेळाडूं छोट्या लिलावात जास्त पैसा मिळवण्यासाठी मोठ्या लिलावात उपलब्ध राहिले नव्हते. यानंतर त्यांनी छोट्या लिलावांमध्ये मोठी रक्कम मिळवली होती. २०२२ च्या मोठ्या लिलावात इशान किशनसाठी सर्वाधिक बोली लावली गेली होती, मुंबई इंडियन्सने त्याला १५.२५ कोटी रुपयांना विकत घेतले. यानंतर २०२४ साठी झालेल्या छोट्या लिलावात मिचेल स्टार्कला केकेआरने २४.७५ कोटी रुपयांना तर पॅट कमिन्सला एसआरएचने २०.५० कोटी रुपयांना विकत घेतले गेले होते.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2025 retention irfan pathan lauds bcci for decision to impose two year ban on foreign players who declare unavailability in auction vbm