IPL 2025 Retention Kolkata Knight Riders Team Players: श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात कोलकाता नाईट रायडर्स संघाने २०२४ हंगामाचं जेतेपद पटकावलं. प्रदीर्घ कालावधीनंतर कोलकाताचं जेतेपदाचं स्वप्न प्रत्यक्षात साकारलं. पण आता संघाला जेतेपद मिळवून देणाऱ्या कर्णधाराला श्रेयस अय्यरला संघाने रिलीज केलं आहे. मेन्टॉर गौतम गंभीर, प्रशिक्षक चंद्रकांत पंडित यांच्यासह कर्णधार श्रेयस अय्यरचा या जेतेपदात महत्त्वाचा वाटा होता. कोलकाताचे जुनेजाणते योद्धे सुनील नरिन आणि आंद्रे रसेल यांनी फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अशा तिन्ही आघाड्यांवर दमदार प्रदर्शन करत संघाच्या विजयाचा पाया रचला. रिंकू सिंग हा कोलकाता संघाचा नवा चेहरा आहे. गेल्या हंगामात गुजरातविरुद्ध शेवटच्या षटकात ५ षटकार खेचत रिंकूने कोलकाताला थरारक विजय मिळवून दिला होता. त्यामुळे रिंकू कोलकाताच्या भविष्यकालीन योजनांचा भाग कायमच असणार आहे आणि त्याला सर्वाधिक १३ कोटींसह संघाने रिटेन केलं आहे. वरुण चक्रवर्ती, हर्षित राणा, आंद्रे रसेल, आणि इमर्जिंग आशिया कपमध्ये आपल्या नेत्रदीपक झेलने सर्वांचं लक्ष वेधून घेणारा रमणदीप सिंग यालाही संघाने रिटेन केलं आहे.

कोलकाताने याआधी गौतम गंभीरच्या नेतृत्वात २०१२ आणि २०१४ मध्ये जेतेपदावर नाव कोरलं आहे. गंभीर यांनी भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाची धुरा स्वीकारल्याने त्यांनी कोलकाताचं मेन्टॉरपद सोडलं. गंभीर यांच्या बरोबरीने कोलकाताच्या सपोर्ट स्टाफचा भाग असलेले अभिषेक नायर आणि रायन टेन डेस्काटा हेही भारताच्या कोचिंग टीमचा भाग झाले आहेत. यामुळे कोलकाताला संघाच्या बरोबरीने सपोर्ट स्टाफचीही नव्याने रचना करावी लागणार आहे.

IPL 2025 LSG Retention Team Players List
LSG IPL 2025 Retention: लखनौमधून कर्णधार केएल राहुल रिलीज, निकोलस पुरनला सर्वाधिक किंमत, २ अनकॅप्ड खेळाडू रिटेन
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
IPL 2025 MI Retention Team Players List
MI IPL 2025 Retention: रोहित-सूर्या-हार्दिक-बुमराह रिटेन, बुमराहला सर्वाधिक रिटेंशन किंमत
IPL 2025 RR Retention Team Players List
RR IPL 2025 Retention: राजस्थानने ६ खेळाडूंना केलं रिटेन, संजू-यशस्वीला सर्वाधिक किंमत, तर ध्रुव जुरेलला…
IPL 2025 Retention CSK Announce Retained Players With Riddle of 5 Names see Cryptic Social Media Post
IPL 2025 Retention: हेलिकॉप्टर, किवी…; CSKने दिली मोठी हिंट, जाहीर केली रिटेन खेळाडूंची यादी? पाहा कोण आहेत ‘हे’ ५ खेळाडू
IPL 2025 GT Retention Team Players List
GT IPL 2025 Retention: गुजरात टायटन्सने कोणत्या खेळाडूंना केलं रिटेन? रशीद खान, गिलला मोठी रक्कम
IPL 2025 CSK Retention Team Players List
CSK IPL 2025 Retention: ऋतुराज-जडेजाला मोठी रिटेंशन किंमत, धोनी अनकॅप्ड खेळाडू; चेन्नईने कोणत्या खेळाडूंना केलं रिटेन?
IPL 2025 RCB Retention Team Players List
RCB IPL 2025 Retention: आरसीबीने फक्त ३ खेळाडूंना केलं रिटेन, विराट कोहलीला तब्बल २१ कोटींना केलं रिटेन

KKR Retained Players: रिटेन केलेले खेळाडू

आंद्र रसेल – १२ कोटी
रिंकू सिंग – १३ कोटी
सुनील नरिन – १२ कोटी
वरुण चक्रवर्ती – १२ कोटी
हर्षित राणा – ४ कोटी
रमणदीप सिंग – ४ कोटी

रिलीज केलेले खेळाडू-

श्रेयस अय्यर, श्रीकर भरत, मनीष पांडे, अंगक्रिश रघुवंशी, रहमनुल्ला गुरबाझ, नितीश राणा, शेरफन रुदरफोर्ड, जेसन रॉय, फिल सॉल्ट, वेंकटेश अय्यर, अनुकूल रॉय, वैभव अरोरा, दुश्मंता चमीरा, एम गनफझर, चेतन सकारिया, सकीब हुसैन, सुयश शर्मा, मिचेल स्टार्क, गस अॅटकिन्सन, मुजीब उर रहमान.