IPL 2025 Retention Kolkata Knight Riders Team Players: श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात कोलकाता नाईट रायडर्स संघाने २०२४ हंगामाचं जेतेपद पटकावलं. प्रदीर्घ कालावधीनंतर कोलकाताचं जेतेपदाचं स्वप्न प्रत्यक्षात साकारलं. पण आता संघाला जेतेपद मिळवून देणाऱ्या कर्णधाराला श्रेयस अय्यरला संघाने रिलीज केलं आहे. मेन्टॉर गौतम गंभीर, प्रशिक्षक चंद्रकांत पंडित यांच्यासह कर्णधार श्रेयस अय्यरचा या जेतेपदात महत्त्वाचा वाटा होता. कोलकाताचे जुनेजाणते योद्धे सुनील नरिन आणि आंद्रे रसेल यांनी फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अशा तिन्ही आघाड्यांवर दमदार प्रदर्शन करत संघाच्या विजयाचा पाया रचला. रिंकू सिंग हा कोलकाता संघाचा नवा चेहरा आहे. गेल्या हंगामात गुजरातविरुद्ध शेवटच्या षटकात ५ षटकार खेचत रिंकूने कोलकाताला थरारक विजय मिळवून दिला होता. त्यामुळे रिंकू कोलकाताच्या भविष्यकालीन योजनांचा भाग कायमच असणार आहे आणि त्याला सर्वाधिक १३ कोटींसह संघाने रिटेन केलं आहे. वरुण चक्रवर्ती, हर्षित राणा, आंद्रे रसेल, आणि इमर्जिंग आशिया कपमध्ये आपल्या नेत्रदीपक झेलने सर्वांचं लक्ष वेधून घेणारा रमणदीप सिंग यालाही संघाने रिटेन केलं आहे.
KKR IPL 2025 Retention: केकेआरचा श्रेयस अय्यरला रामराम! जेतेपद मिळवून देणाऱ्याला कर्णधाराला केलं रिलीज, २ विदेशी-२ अनकॅप्ड खेळाडू रिटेन
IPL 2025 Retention KKR Team Players: आयपीएल २०२४ च्या लिलावापूर्वी कोलकाता नाईट रायडर्सचा संघ कोणत्या खेळाडूंना रिटेन आणि रिलीज करू शकतात, जाणून घेऊया.
Written by स्पोर्ट्स न्यूज डेस्क
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 30-10-2024 at 16:32 IST
© IE Online Media Services (P) Ltd
© IE Online Media Services (P) Ltd
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2025 retention kkr kolkata knight riders team players list andre russell rinku singh sunil narine harshit rana varun chakrvarthy bdg