IPL 2025 Retention Team-wise retained players, purse and RTMs left for Mega Auction: आयपीएल २०२५ च्या लिलावापूर्वी बहुचर्चित असं खेळाडूंचं रिटेंशन पार पडलंय. सर्व संघांनी रिटेन खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. काही खेळाडूंनी ५-६ तर काहींनी फक्त २ आणि ३ खेळाडूंना रिटेन केलं आहे. याचबरोबर काही मोठ्या खेळाडूंना संघांनी रिलीज केलं आहे. सर्व १० फ्रँचायझींनी एकूण ४७ खेळाडूंना कायम ठेवले आहे. कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांनी प्रत्येकी सर्वाधिक ६ खेळाडू रिटेन केले तर मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्ज, लखनौ सुपर जायंट्स, राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांनी प्रत्येकी ५ खेळाडू कायम ठेवले.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ३ तर पंजाब किंग्जने दोन खेळाडूंना कायम ठेवले. सर्व संघांनी कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी आणि प्रत्येक संघाच्या पर्समध्ये किती पैसे शिल्लक आहेत ते जाणून घेऊया.

हेही वाचा – Rohit Sharma: “मी निवृत्ती घेतल्यानंतर या क्रमांकावर…”, रोहित शर्माने सूर्या-हार्दिकपेक्षा कमी रिटेंशन किंमत मिळाल्यानंतर केले मोठे वक्तव्य, पाहा VIDEO

प्रत्येक फ्रँचायझीने रिटेन केलेल्या खेळाडूंची संपूर्ण यादी

  • मुंबई इंडियन्स

रिटेन केलेले खेळाडू:
जसप्रीत बुमराह – १८ कोटी
सूर्यकुमार यादव – १६.३५ कोटी
हार्दिक पंड्या – १६.३५ कोटी
रोहित शर्मा – १६.३ कोटी
तिलक वर्मा – ८ कोटी

लिलावासाठी पर्समध्ये शिल्लक राहिलेले पैसे: रु ५५ कोटी (१२० कोटींपैकी)
राईट टू मॅच (RTM): १

  • सनरायझर्स हैदराबाद

रिटेन केलेले खेळाडू:
हेनरिकच क्लासेन – २३ कोटी
पॅट कमिन्स – १८ कोटी
ट्रेव्हिस हेड – १४ कोटी
अभिषेक शर्मा – १४ कोटी
नितीश कुमार रेड्डी – ६ कोटी
लिलावासाठी पर्समध्ये शिल्लक राहिलेले पैसे: रु ४५ कोटी (१२० कोटींपैकी)
राईट टू मॅच (RTM): १

हेही वाचा – MI IPL 2025 Retention: रोहित-सूर्या-हार्दिक-बुमराह रिटेन, बुमराहला सर्वाधिक रिटेंशन किंमत

  • रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू

रिटेन केलेले खेळाडू:
विराट कोहली – २१ कोटी
रजत पाटीदार – ११ कोटी
यश दयाल – ५ कोटी
लिलावासाठी पर्समध्ये शिल्लक राहिलेले पैसे: रु ८३ कोटी (१२० कोटींपैकी)
राईट टू मॅच (RTM): ३

  • राजस्थान रॉयल्स

रिटेन केलेले खेळाडू
संजू सॅमसन – १८ कोटी
यशस्वी जैस्वाल – १८ कोटी
ध्रुव जुरेल – १४ कोटी
रियान पराग – १४ कोटी
शिमरॉन हेटमायर – ११ कोटी
संदीप शर्मा ४ कोटी
लिलावासाठी पर्समध्ये शिल्लक राहिलेले पैसे: रु ४१ कोटी (१२० कोटींपैकी)
राईट टू मॅच (RTM): एकही नाही

हेही वाचा – SRH IPL 2025 Retention: सर्वात मोठी रक्कम! हेनरिक क्लासेनला २३ कोटींमध्ये केलं रिटेन, हैदराबादने भुवनेश्वर कुमारला केलं रिलीज

  • गुजरात टायटन्स

रिटेन केलेले खेळाडू
रशीद खान – १८ कोटी
शुबमन गिल – १६.५० कोटी
साई सुदर्शन – ८.५० कोटी
राहुल तेवतिया – ४ कोटी
शाहरूख खान – ४ कोटी
लिलावासाठी पर्समध्ये शिल्लक राहिलेले पैसे: रु ६९ कोटी (१२० कोटींपैकी)
राईट टू मॅच (RTM): १

  • लखनौ सुपर जायंट्स

रिटेन केलेले खेळाडू
निकोलस पुरन – २१ कोटी
रवी बिश्नोई – ११ कोटी
कुलदीप यादव – ११ कोटी
मोहसीन खान – ४ कोटी
आयुष बदोनी – ४ कोटी
लिलावासाठी पर्समध्ये शिल्लक राहिलेले पैसे: रु ६९ कोटी (१२० कोटींपैकी)
राईट टू मॅच (RTM): १

हेही वाचा – IPL 2025 Retention: पंजाबला ‘शशांक’ पावला- चुकून खरेदी, संधीचं सोनं आणि थेट रिटेन

  • पंजाब किंग्स

रिटेन केलेले खेळाडू
शशांक सिंग – ५.५ कोटी
प्रभसिमरन सिंग – ४ कोटी
लिलावासाठी पर्समध्ये शिल्लक राहिलेले पैसे: रु ११०.०५ कोटी (१२० कोटींपैकी)
राईट टू मॅच (RTM): ४

  • दिल्ली कॅपिटल्स

रिटेन केलेले खेळाडू
अक्षर पटेल १६.५० कोटी
कुलदीप यादव – १३.२५ कोटी
ट्रिस्टन स्टब्स – १० कोटी
अभिषेक पोरेल – ४ कोटी
लिलावासाठी पर्समध्ये शिल्लक राहिलेले पैसे: रु ७३ कोटी (१२० कोटींपैकी)
राईट टू मॅच (RTM): २

  • चेन्नई सुपर किंग्स

रिटेन केलेले खेळाडू
ऋतुराज गायकवाड- १८ कोटी
रवींद्र जडेजा – १८ कोटी
महेंद्रसिंग धोनी – ४ कोटी
मथिशा पथिराणा – १३ कोटी
शिवम दुबे – १२ कोटी
लिलावासाठी पर्समध्ये शिल्लक राहिलेले पैसे: रु ६५ कोटी (१२० कोटींपैकी)
राईट टू मॅच (RTM): १

  • कोलकाता नाईट रायडर्स

रिटेन केलेले खेळाडू
रिंकू सिंग – १३ कोटी
वरूण चक्रवर्ती – १२ कोटी
सुनील नरिन – १२ कोटी
आंद्रे रसेल – १२ कोटी
हर्षित राणा – ४ कोटी
रमणदीप सिंग – ४ कोटी
लिलावासाठी पर्समध्ये शिल्लक राहिलेले पैसे: रु ५१ कोटी (१२० कोटींपैकी)
राईट टू मॅच (RTM): एकही नाही