IPL 2025 Retention Lucknow Super Giants Team Retained and Released Players: लखनौ सुपरजायंट्स संघाने लोकेश राहुलच्या नेतृत्वात संघाची उभारणी केली होती. पण लखनौ संघाचे मालक संजीव गोएंका आणि राहुल यांच्यात गेल्या हंगामात एका सामन्यानंतर बेबनाव झाला होता. राहुलच्या संथ खेळामुळे स्ट्राईक रेटमुळे त्याच्यावर प्रचंड टीका झाली होती. राहुलच्या नेतृत्वात खेळणाऱ्या लखनौ संघाने चांगली सुरुवात केली होती, मात्र त्यांना जेतेपद पटकावता आलेलं नाही. आता चर्चांप्रमाणे लखनौ संघाने केएल राहुलला रिलीज केलं आहे. राहुलच्या अनुपस्थितीत वेस्ट इंडिजचा धडाकेबाज निकोलस पूरनने सक्षमपणे नेतृत्वाची धुरा हाताळली. पूरनने गेल्या वर्षभरात फलंदाज आणि नेतृत्व अशा दोन्ही आघाड्यांवर स्वत:ला वारंवार सिद्ध केलं आहे. पुरनला आता सर्वाधिक २१ कोटींसह रिटेन केलं आहे.

निकोलस पूरनकडे लखनौचं कर्णधारपद असेल अशी शक्यता आहे. संघाने सर्वाधिक रिटेंशन किंमतीसह पुरनला संघात कायम ठेवलं आहे. कर्णधारपदाच्या बरोबरीने पूरन विकेटकीपिंगची जबाबदारीही सांभाळतो.

IPL 2025 RR Retention Team Players List
RR IPL 2025 Retention: राजस्थानने ६ खेळाडूंना केलं रिटेन, संजू-यशस्वीला सर्वाधिक किंमत, तर ध्रुव जुरेलला…
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
IPL 2025 KKR Retention Team Players List
KKR IPL 2025 Retention: केकेआरचा श्रेयस अय्यरला रामराम! जेतेपद मिळवून देणाऱ्याला कर्णधाराला केलं रिलीज, २ विदेशी-२ अनकॅप्ड खेळाडू रिटेन
IPL 2025 Retention CSK Announce Retained Players With Riddle of 5 Names see Cryptic Social Media Post
IPL 2025 Retention: हेलिकॉप्टर, किवी…; CSKने दिली मोठी हिंट, जाहीर केली रिटेन खेळाडूंची यादी? पाहा कोण आहेत ‘हे’ ५ खेळाडू
IPL 2025 GT Retention Team Players List
GT IPL 2025 Retention: गुजरात टायटन्सने कोणत्या खेळाडूंना केलं रिटेन? रशीद खान, गिलला मोठी रक्कम
IPL 2025 MI Retention Team Players List
MI IPL 2025 Retention: रोहित-सूर्या-हार्दिक-बुमराह रिटेन, बुमराहला सर्वाधिक रिटेंशन किंमत
IPL 2025 RCB Retention Team Players List
RCB IPL 2025 Retention: आरसीबीने फक्त ३ खेळाडूंना केलं रिटेन, विराट कोहलीला तब्बल २१ कोटींना केलं रिटेन
IPL 2025 PBKS Retention Team Players List
PBKS IPL 2025 Retention: पंजाब किंग्ज संघाचा होणार कायापालट, लिलावात चुकून घेतलेल्या खेळाडूसह फक्त एकाला केलं रिटेन

प्रचंड वेग आणि अचूकतेसह प्रतिस्पर्धी फलंदाजांची भंबेरी उडवणारा मयांक यादव, डावखुरा वेगवान गोलंदाज मोहसीन खान या दोघांसह फिरकीपटू रवी बिश्नोई लखनौच्या भविष्यकालीन योजनांचा भाग आहेत. या दोघांनाही संघाने रिटेन केलं ाहे.

LSG Retained Players: रिटेन केलेले खेळाडू

निकोलस पुरन – २१ कोटी
रवी बिश्नोई – ११ कोटी
मयांक यादव – ११ कोटी
आयुष बदोनी – ४ कोटी
मोहसीन खान – ४ कोटी

रिलीज केलेले खेळाडू-

के.एल.राहुल, क्विंटन डी कॉक, देवदत्त पड्डीकल, अॅश्टन टर्नर, कृष्णप्पा गौतम, दीपक हुड्डा, अर्शिन कुलकर्णी, प्रेरक मंकड, काईल मेयर्स, कृणाल पंड्या, मार्कस स्टॉइनस, डेव्हिड विली, अर्शद खान, मॉट हेन्री, शामर जोसेफ, अमित मिश्रा, नवीन उल हक, मनीमरन सिद्धार्थ, यश ठाकूर, युधवीर सिंग, शिवम मावी, मार्क वूड.

Story img Loader