IPL 2025 Retention Mumbai Indians Team Players: स्पर्धेतला बहुचर्चित असा हा संघ. मुंबई इंडियन्स संघाने गेल्या वर्षीच्या हंगामापूर्वी एका धक्कादायक निर्णय घेतला. पाच जेतेपदं मिळवून देणाऱ्या रोहित शर्माऐवजी मुंबईने हार्दिक पंड्याची कर्णधार म्हणून नियुक्ती केली. हार्दिकने मुंबई इंडियन्समधूनच आयपीएल कारकीर्दीला सुरुवात केली. अष्टपैलू हार्दिक पंड्याने मुंबईच्या जेतेपदांमध्ये मोलाची भूमिका बजावली आहे. मात्र गुजरात टायटन्स संघाने हार्दिकला ताफ्यात समाविष्ट केलं आणि समीकरणं बदलली.

हार्दिकने स्वत:मधल्या नेतृत्वगुणांचा प्रत्यय घडवत पदार्पणाच्या हंगामातच गुजरातला जेतेपद मिळवून दिलं. सलग दुसऱ्या वर्षीही हार्दिकच्या नेतृत्वातील गुजरातने अंतिम फेरी गाठली पण जेतेपद त्यांना मिळू शकलं नाही. यानंतर ट्रेडऑफमध्ये मुंबई इंडियन्स संघाने हार्दिकला आपल्या ताफ्यात घेतलं. हार्दिकच्या समावेशाने संघाला संतुलन आणि बळकटी मिळेल असा विश्वास मुंबई संघव्यवस्थापनाला होता. हा विश्वास हार्दिकने सार्थ ठरवला. मुंबईने कर्णधार म्हणून रोहितच्या जागी हार्दिकची नियुक्ती केल्याने वादाला तोंड फुटलं. हार्दिकला सोशल मीडियावर आणि प्रत्यक्ष मैदानावरही प्रचंड ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं. मुंबई इंडियन्सची कामगिरीही लौकिकाला साजेशी झाली नाही आणि त्यांना प्राथमिक फेरीतच गाशा गुंडाळावा लागला. यामुळे हार्दिकवरच्या टीकेचा जोर वाढला.

हेही वाचा – IPL 2025 Retention: हेलिकॉप्टर, किवी…; CSKने दिली मोठी हिंट, जाहीर केली रिटेन खेळाडूंची यादी? पाहा कोण आहेत ‘हे’ ५ खेळाडू

हार्दिककडेच मुंबई संघाची सूत्रं आहेत असल्याने रिटेन्शन यादीत तो आहे. हार्दिक पंड्याला १६.३५ कोटींची रिटेंशन किमत आहे. चाळिशीकडे झुकलेला आणि आंतरराष्ट्रीय टी२० प्रकारातून निवृत्ती घेतलेला रोहित शर्मा आणखी किती वर्ष खेळणार याबाबत स्पष्टता नाही. पण आणखी काही वर्ष रोहितने आपल्यासाठीच खेळावं असा मुंबईचा आग्रह असेल आणि त्याप्रमाणेच मुंबईने त्याला रिटेन केलं आहे. रोहितला पाच रिटेन केलेल्या खेळाडूच्या तुलनेत रोहितला कमी म्हणजेच १६ कोटी रक्कम आहे. मुंबई इंडियन्सकडून खेळतानाच सूर्यकुमार यादवने स्वत:च्या गुणवत्तेला न्याय देत दमदार भरारी घेतली. आंतरराष्ट्रीय टी२० प्रकारात सूर्यकुमारने अव्वल स्थानीही झेप घेतली. या प्रकारात सूर्यकुमार भारताचा कर्णधारही झाला. सूर्यकुमार मुंबई इंडियन्सचा कर्णधार होईल अशी चिन्हं होती. मात्र संघव्यवस्थापनाने हार्दिकच्या नावाला पसंती दिली. पण सूर्यकुमार मुंबईच्या फलंदाजीचा कणा असेल हे नक्की. सूर्याला मुंबईने १६.३५ कोटींना रिटेन केलं आहे. तर तिलक वर्माला ८ कोटींना रिटेन केलं आहे.

हेही वाचा – DC IPL 2025 Retention: दिल्लीचे तख्त नव्याने बसणार?

भात्यात विविध अस्त्रं असलेला जसप्रीत बुमराह हा मुंबई संघाचा अविभाज्य कणा आहे. डावाच्या सुरुवातीला आणि हाणामारीच्या षटकांमध्ये विकेट्स पटकावणं आणि धावा रोखणं या दोन्ही आघाड्या बुमराहने समर्थपणे सांभाळल्या आहेत. भागीदारी फोडण्यात पटाईत अशी बुमराहची ख्याती आहे. बुमराहची चार षटकं वगळूनच प्रतिस्पर्धी संघाने नियोजन करावं असं माजी खेळाडू सांगतात. इतकी त्याची धास्ती आहे. रिटेन्शन यादीत बुमराहचं नाव पक्कं असणार याबाबत चाहत्यांच्या मनात तिळमात्रही शंका नाही. सर्वाधिक किंमत देत जसप्रीत बुमराहला १८ कोटींना संघात घेतलं आहे.

MI Retained Players: रिटेन केलेले खेळाडू

हार्दिक पंड्या – १६. ३५ कोटी
रोहित शर्मा – १६ कोटी
सूर्यकुमार यादव – १६. ३५ कोटी
जसप्रीत बुमराह – १८ कोटी
तिलक वर्मा – ८ कोटी

मुंबई इंडियन्स रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी-

टीम डेव्हिड, हार्विक देसाई, इशान किशन, नमन धीर, शिवालिक शर्मा, नेहल वढेरा, विष्णू विनोद, डेवाल्ड ब्रेव्हिस, पीयुष चावला, श्रेयस गोपाळ, अंशुल कंबोज, मोहम्मद नबी, शम्स मुलानी, रोमारिओ शेफर्ड, गेराल्ड कुत्सिया, कुमार कार्तिकेय, आकाश मढवाल, क्वेना मफाका, अर्जुन तेंडुलकर, नुवान तुषारा, ल्यूक वूड, जेसन बेहनड्रॉफ, दिलशान मधुशनका.

Story img Loader