IPL 2025 Retention Punjab Kings Team Players: नवा हंगाम, नवे खेळाडू, नवा कर्णधार, नवे प्रशिक्षक- अशा पद्धतीने पंजाबचं काम चालतं. गेल्या काही हंगामात शिखर धवनने पंजाबचं नेतृत्व केलं आहे. मात्र धवनने निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. यामुळे पंजाबला कर्णधारापासूनच सुरुवात करावी लागणार आहे. शेवटच्या लिलावात पंजाबने सॅम करनसाठी तिजोरी रिती केली होती. मात्र करनला लौकिकाला साजेसा खेळ करता आलेला नाही.

हेही वाचा – KKR IPL 2025 Retention: जेतेपद मिळवून देणाऱ्याला कर्णधाराला केकेआर सोडणार?

आशुतोष शर्मा आणि शशांक सिंग या भारतीय खेळाडूंनी मात्र गेल्या हंगामात अफलातून खेळ करत चाहत्यांचा विश्वास संपादन केला. सिकंदर रझा सातत्याने चांगला खेळत आहे. जॉनी बेअरस्टो, लायम लिव्हिंगस्टोन या इंग्लंडच्या खेळाडूंना रिटेन करण्याची शक्यता कमी आहे. जितेश शर्मा या विदर्भच्या युवा खेळाडूने दमदार खेळाच्या जोरावर छाप उमटवली आहे. हर्षल पटेल आणि अर्शदीप सिंग या जोडगोळीपैकी किमान एकाला रिटेन केलं जाऊ शकतं. प्रभसिमरन सिंग, हरप्रीत ब्रार यांच्यासाठी राईट टू रिटेन कार्ड वापरलं जाऊ शकतं. पंजाबला जेतेपदाच्या दृष्टीने खरंच वाटचाल करायची असेल तर नव्याने संघबांधणी करावी लागेल.