IPL 2025 Retention Punjab Kings Team Players: नवा हंगाम, नवे खेळाडू, नवा कर्णधार, नवे प्रशिक्षक- अशा पद्धतीने पंजाबचं काम चालतं. गेल्या काही हंगामात शिखर धवनने पंजाबचं नेतृत्व केलं आहे. मात्र धवनने निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. यामुळे पंजाबला कर्णधारापासूनच सुरुवात करावी लागणार आहे. शेवटच्या लिलावात पंजाबने सॅम करनसाठी तिजोरी रिती केली होती. मात्र करनला लौकिकाला साजेसा खेळ करता आलेला नाही. त्यामुळे त्याला आगामी हंगामापूर्वी संघाने रिलीज केलं आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे संघाने फक्त २ खेळाडूंना रिटेन केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – KKR IPL 2025 Retention: जेतेपद मिळवून देणाऱ्याला कर्णधाराला केकेआर सोडणार?

आशुतोष शर्मा आणि शशांक सिंग या भारतीय खेळाडूंनी मात्र गेल्या हंगामात अफलातून खेळ करत चाहत्यांचा विश्वास संपादन केला. त्यावरून संघाने फक्त शशांक सिंगला संघात सामील केलं. शशांक सिंगला संघाने आयपीएल २०२४ च्या लिलावात चुकून संघात सामील केलं होतं, पण त्यानेच अनेक सामन्यांमध्ये संघासाठी उत्कृष्ट कामगिरी केली. सिकंदर रझा सातत्याने चांगला खेळत आहे, पण नव्याने संघ बांधणीचा विचार करता संघाने सर्वच खेळाडूंना रिलीज केलं आहे. जॉनी बेअरस्टो, लायम लिव्हिंगस्टोन या इंग्लंडच्या खेळाडूंना रिटेन करण्याची शक्यता फार कमी होती. जितेश शर्मा या विदर्भच्या युवा खेळाडूने दमदार खेळाच्या जोरावर छाप उमटवली आहे, पण त्यालाही संघाने रिटेन केलं नाही. हर्षल पटेल आणि अर्शदीप सिंग या जोडगोळीपैकी किमान एकाला रिटेन केलं जाऊ शकतं, अशी चिन्हे होती. पण संघाने मोठा धक्का देत या दोघांनाही रिलीज केलं आहे. प्रभसिमरन सिंगला संघाने रिटेन करत संघात कायम ठेवलं आहे. पंजाबला जेतेपदाच्या दृष्टीने खरंच वाटचाल करायची असेल तर नव्याने संघबांधणी करण्याची गरज आहे. त्यादिशेने या लिलावात सर्वाधिक पर्ससह संघाने पाऊल टाकले आहे.

PBKS Retained Players: रिटेन केलेले खेळाडू

शशांक सिंग – ५.५ कोटी
प्रभसिमरन सिंग – ४ कोटी

रिलीज केलेले खेळाडू

शिखर धवन, हरप्रीत सिंग, रायली रुसो, जितेश शर्मा, जॉनी बेअरस्टो, ऋषी धवन, आशुतोष शर्मा, शिवम सिंग, सिकंदर रझा, अथर्व तायडे, सॅम करन, लायम लिव्हिंगस्टोन, ख्रिस वोक्स, अर्शदीप सिंग, राहुल चहर, नॅथन एलिस, हरप्रीत ब्रार, विधवत कावेरप्पा, हर्षल पटेल, तनय त्यागराजन, कागिसो रबाडा, अर्शदीप सिंग प्रिन्स चौधरी, विश्वनाथ सिंग.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2025 retention punjab kings pbks team players list arshdeep sing shahank singh jitesh sharma prabhsimran singh bdg