IPL 2025 Retention Royal Challengers Bengaluru Team Players: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ नव्याने संघ उभारणी करणार आहे. दक्षिण आफ्रिकेच्या फाफ डू प्लेसिसने संघाचं नेतृत्व सांभाळलं आहे. त्याचा फिटनेस उत्तम आहे. फॉर्मही चांगला आहे मात्र तो चाळिशीत आला आहे. तो आणखी किती वर्ष आयपीएलसारखी दोन महिने चालणारी स्पर्धा खेळू शकतो याबाबत साशंकता आहे. त्यामुळे संघाने भविष्याचा विचार करता फाफ डू प्लेसिसला रिलीज केलं आहे. अशारितीने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू पुन्हा एकदा विराट कोहलीकडे नेतृत्वाची धुरा सोपवण्याची शक्यता आहे.
बंगळुरूकडे ग्लेन मॅक्सवेलसारखा मोहरा आहे. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण तसंच कर्णधारपद अशा सगळ्या आघाड्या मॅक्सवेल समर्थपणे सांभाळू शकतो. पण त्याच्या खेळात सातत्य नसतं. पण आरसीबीने मात्र फक्त ३ खेळाडूंना रिटेन केलं आहे. ज्यात विराट कोहली, रजत पाटीदार आणि यश दयाल या खेळाडूंना रिटेन केलं आहे. मोठी बाब म्हणजे संघाने वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि आकाश दीप यांनाही रिलीज केलं आहे.
RCB Retained Players: रिटेन केलेले खेळाडू
विराट कोहली – २१ कोटी
रजत पाटीदार – ११ कोटी
यश दयाल – ५ कोटी
रिलीज केलेले खेळाडू
फाफ डू प्लेसिस, अनुज रावत, सौरव चौहान, दिनेश कार्तिक, मनोज भदांगे, टॉम करन, कॅमेरुन ग्रीन, विल जॅक्स, महिपाल लोमरुर, ग्लेन मॅक्सवेल, सुयश प्रभूदेसाई, आकाश दीप, मयांक डागर, लॉकी फर्ग्युसन, अल्झारी जोसेफ, मोहम्मद सिराज, राजन कुमार, हिमांशु शर्मा, करण शर्मा, स्वप्नील सिंग, रीस टोपले, विजयकुमार व्यषक