IPL 2025 Retention Rajasthan Royals Team Players List : आयपीएल २०२५ च्या आधी होणाऱ्या मेगा ऑक्शनसाठी खेळाडूंना रिटेन आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर झाली आहे. सर्व १० संघानी गुरुवारी (३१ ऑक्टोबर) रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली. यामध्ये राजस्थान रॉयल्सने जाहीर केलेल्या यादीमुळे सर्वांना चकित केले आहे. त्यांनी आयपीएल २०२५ पूर्वी एकूण ६ खेळाडूंना रिटेन केले आहे. विशेष म्हणजे या संघाने स्फोटक फलंदाज जोस बटलरला रिलीज केले आहे आणि त्याच्या ऐवजी युवा शिमरॉन हेटमायरला प्राधान्य दिले आहे.
राजस्थानने जोस बटरल का रिलीज केले?
या संघाने गेल्या अनेक हंगामात संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली अप्रतिम कामगिरी केली आहे. अष्टपैलू रियान पराग, अनुभवी फिरकीपटू रवीचंद्रन अश्विन आणि युझवेंद्र चहल यांच्यासह डावखुरा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट यांना राजस्थानने रिलीज केले आहे. सध्याच्या घडीला टी-२० क्रिकेटमधील उत्कृष्ट फलंदाजांपैकी एक असलेला खेळाडू म्हणजे जोस बटलर आहे. पण बटलर गेल्या ३ महिन्यांपासून दुखापतीने त्रस्त आहे, त्यामुळे संघाच्या भविष्याचा विचार करता त्याला रिलीज करण्यात आले आहे. त्याच्या ऐवजी युवा शिमरॉन हेटमायरला प्राधान्य दिले आहे.
राजस्थान रॉयल्सने आयपीएल २०२५ साठी रिटेन केलेले खेळाडू :
संजू सॅमसन (कर्णधार ) – १८ कोटी
यशस्वी जैस्वाल – १८ कोटी
ध्रुव जुरेल १४ कोटी
रियान पराग – १४ कोटी
शिमरॉन हेटमायर – ११ कोटी
संदीप शर्मा ४ कोटी
आयपीएल २०२५ च्या मेगा ऑक्शनपूर्वी रिलीज केलेले खेळाडू:
जोस बटलर, शुभम दुबे, टॉम कोहलर-कॅडमोर, रोव्हमन पॉवेल, कुणाल सिंग राठोड, अबिद मुश्ताक, रविचंद्रन अश्विन, डोनाव्हन फरेरा, तनुष कोटियन, अवेश खान, ट्रेंट बोल्ट, नांद्रे बर्गर, युझवेंद्र चहल, केशव महाराज, नवदीप सैनी, कुलदीप सेन, प्रसिध कृष्णा, अॅडम झंपा.