IPL 2025 Retention Rajasthan Royals Team Players: संजू सॅमसनने राजस्थानचं खंबीरपणे नेतृत्व केलं आहे. प्रमुख फलंदाज आणि विकेटकीपर या नात्याने संजूकडेच राजस्थानची सूत्रं असणार आहेत. संजूच्या बरोबरीने धडाकेबाज सलामीवीर यशस्वी जैस्वालला राजस्थान ताफ्यात कायम ठेवलं आहे. भारतीय संघाचा भरवशाचा सलामीवीर झालेला यशस्वी राजस्थानसाठी हुकूमी एक्का आहे. राजस्थान संघव्यवस्थापनासमोर या दोघांव्यतिरिक्त आणखी कोणाला ताफ्यात राखायचं असा यक्षप्रश्न आहे. संजू सॅमसन आणि यशस्वी जैस्वालने संघाला सारख्याच किंमतीला रिटेन केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अष्टपैलू रियान पराग, अनुभवी फिरकीपटू रवीचंद्रन अश्विन आणि युझवेंद्र चहल यांच्यासह डावखुरा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट यांना राजस्थानने रिलीज केलं आहे.. सध्याच्या घडीला टी-२० क्रिकेटमधील उत्कृष्ट फलंदाजांपैकी एक असलेला खेळाडू म्हणजे जोस बटलर आहे. पण बटलर गेल्या ३ महिन्यांपासून दुखापतीने त्रस्त आहे, त्यामुळे संघाच्या भविष्याचा विचार करता त्याला रिलीज करण्यात आलं आहे. त्याचबरोबर संघाचा फलंदाज ध्रुव जुरेलला संघाने १४ कोटींसह रिटेन केलं आहे. युझवेंद्र चहलला राजस्थान संघाने रिलीज केलं आहे.

हेही वाचा – IPL 2025 Retention: हेलिकॉप्टर, किवी…; CSKने दिली मोठी हिंट, जाहीर केली रिटेन खेळाडूंची यादी? पाहा कोण आहेत ‘हे’ ५ खेळाडू

टी२० वर्ल्डकप पटकावल्यानंतर प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा कार्यकाळ संपला. द्रविड आता राजस्थान रॉयल्सचे प्रशिक्षक असणार आहेत. टीम इंडियाच्या सपोर्ट स्टाफमधील त्यांचे सहकारी विक्रम राठोड राजस्थानचे फलंदाजी प्रशिक्षक असणार आहेत. द्रविड याआधीही राजस्थान रॉयल्स संघाशी संलग्न होते. आता पुन्हा एकदा ते नव्याने संघबांधणी करुन राजस्थानला जेतेपदाच्या मार्गावर आणण्यासाठी सज्ज आहेत.

RR Retained Players: रिटेन केलेले खेळाडू

संजू सॅमसन – १८ कोटी
यशस्वी जैस्वाल – १८ कोटी
ध्रुव जुरेल १४ कोटी
रियान पराग – १४ कोटी
शिमरॉन हेटमायर – ११ कोटी
संदीप शर्मा ४ कोटी

रिलीज केलेले खेळाडू

जोस बटलर, शुभम दुबे, टॉम कोहलर-कॅडमोर, रोव्हमन पॉवेल, कुणाल सिंग राठोड, अबिद मुश्ताक, रवीचंद्रन अश्विन, डोनाव्हन फरेरा, तनुष कोटियन, अवेश खान, ट्रेंट बोल्ट, नांद्रे बर्गर, युझवेंद्र चहल, केशव महाराज, नवदीप सैनी, कुलदीप सेन, प्रसिध कृष्णा, अॅडम झंपा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2025 retention rr rajasthan royals sanju samson yashasvi jaiswal riyan parag trent boult dhruv jurel bdg