MS Dhoni can play as uncapped Indian after IPL 2025 Retention Rules Announced : आयपीएल २०२५ मेगा ऑक्शन नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे, परंतु त्यापूर्वी आयपीएल गव्हर्निंग काऊंसिलने खेळांडूचे राखीव धोरण जाहीर केले आहे. यामध्ये, सर्व संघ विद्यमान संघातील जास्तीत जास्त ६ खेळाडूंना कायम ठेवू शकतात. हे एकतर रिटेंशनद्वारे किंवा राईट टू मॅच (आरटीएम) पर्याय वापरून असू शकते. तसेच इम्पॅक्ट प्लेयर नियम २०२७ पर्यंत लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे चेन्नई सुपर किंग्जसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे. कारण आता महेंद्रसिंग धोनी अनकॅप्ड खेळाडू म्हणून खेळू शकतो, असा नियम करण्यात आला आहे.

आयपीएल गव्हर्निंग काऊंसिलच्या प्रेस रिलीझमध्ये असे म्हटले आहे की, जर एखाद्या कॅप्ड भारतीय खेळाडूने संबंधित हंगामाच्या आधीच्या पाच कॅलेंडर वर्षांत आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सुरुवातीच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये (कसोटी सामना, एकदिवसीय, टी२० आंतरराष्ट्रीय) खेळला नसेल किंवा जर त्याचा बीसीसीआयशी केंद्रीय करार नसेल, तर तो अनकॅप्ड असेल. हा नियम फक्त भारतीय खेळाडूंना लागू असेल.

mpsc exam latest news in marathi
MPSC Exam 2025: ‘एमपीएससी’ परीक्षेसाठी मोबाईल जॅमर, सीसीटीव्ही, पोलीस आणि…
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Why is there a delay in the appointment of candidates who have passed MPSC
कोलमडलेले वेळापत्रक, न्यायालयीन विलंब, लालफीतशाही… ‘एमपीएससी’ उत्तीर्ण उमेदवारांच्या नियुक्तीस विलंब का होतो?
Virat Kohli play in Ranji Trophy 2025 crowd of fans gathering outside Arun Jaitley watching Virat video viral
Virat Kohli Ranji Trophy : विराटला १३ वर्षांनंतर रणजी सामना खेळताना पाहण्यासाठी चाहत्यांची तुफान गर्दी, अरुण जेटली स्टेडियमबाहेर लांबच लांब रांगा
Virat Kohli returns to Ranji Trophy cricket sport news
कोहलीला सूर गवसणार? रणजी करंडकात आज १२ वर्षांनी
What Suresh Dhas Said?
Suresh Dhas : सुरेश धस सगळा हिशेब मांडत म्हणाले, “धनंजय मुंडे पालकमंत्री असताना ७३ कोटी…”
Mora Mumbai Ro Ro service to be operational by March 2026
मोरा-मुंबई रो रो सेवा मार्च २०२६ पर्यंत कार्यान्वित; अनेक महिने बंद असलेले काम पुन्हा सुरू
TIk Tok Ban Reason| Which Countries have Banned TIk Tok App and Why
TIk Tok Ban Reason : भारतात TikTok बंदीची पाच वर्षे, आणखी कुठल्या देशांमध्ये आहे बंदी? काय आहे कारण?

शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना न्यूझीलंडविरुद्ध खेळला होता-

अनुभवी खेळाडू महेंद्रसिंग धोनीने भारतासाठी शेवटचा सामना जुलै २०१९ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळला होता. तेव्हापासून त्याला टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळालेले नाही. त्यानंतर १५ ऑगस्ट २०२० रोजी त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यानंतर तो फक्त आयपीएलमध्ये खेळताना दिसत आहे. नियमांनुसार धोनी आता आयपीएल २०२५ मध्ये अनकॅप्ड खेळाडू म्हणून खेळू शकतो. यामुळे फ्रँचायझी त्याला कमी किमतीत आपल्याकडे ठेवू शकणार आहे.

हेही वाचा – IPL 2025: BCCI चा ऐतिहासिक निर्णय, IPL मध्ये खेळाडूंना मॅच फी म्हणून मिळणार ७.०५ लाख, तर सर्व सामने खेळण्यासाठी मिळणार कोट्यवधी रूपये

चेन्नई सुपर किंग्ज संघाने पाच विजेतेपद पटकावले –

महेंद्रसिंग धोनीची गणना महान कर्णधारांमध्ये केली जाते. त्याने आपल्या शांत आणि हुशारीने चेन्नई सुपर किंग्जला अनेक सामने जिंकून दिले आहेत. धोनीच्या नेतृत्वाखाली सीएसके संघाने पाच वेळा (२०१०, २०११, २०१८, २०२१ आणि २०२३) आयपीएल विजेतेपद पटकावले. आयपीएलमधील दोन मोसमात तो रायझिंग पुणे सुपरजायंट्सकडूनही खेळला आहे. आयपीएलमध्ये त्याला पाहण्यासाठी चाहते खासकरून स्टेडियममध्ये पोहोचतात. तो २००८ पासून आयपीएलमध्ये खेळत आहे आणि त्याने आतापर्यंत एकूण २६४ सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने ५२४३ धावा केल्या आहेत. या काळात त्याची सर्वोच्च धावसंख्या ८४ धावा आहे. धोनीने आयपीएलमध्ये २४ अर्धशतकेही झळकावली आहेत.

Story img Loader