IPL 2025 retention uncapped player rule benefit for three teams : आयपीएल २०२५ च्या रिटेंशन नियमांबाबत बीसीसीआयने अधिकृत घोषणा केली आहे. शुक्रवारी झालेल्या आयपीएल गव्हर्निंग काऊंसिलच्या बैठकीनंतर बीसीसीआयने या स्पर्धेबाबत अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. आयपीएल २०२५ साठी बीसीसीआयने अनेक बदल केले आहेत, त्यातील सर्वात महत्त्वाचा निर्णय अनकॅप्ड खेळाडूंबाबत घेतला आहे. ज्याचा फायदा एमएस धोनीच्या चेन्नई सुपर किंग्ज संघासह इतर दोन संघांनाही होणार आहे.

बीसीसीआयचा अनकॅप्ड खेळाडूंबाबत महत्त्वाचा निर्णय –

आता संघ ६ खेळाडूंना कायम ठेवू शकतील. यामध्ये पाच कॅप्ड आणि एका अनकॅप्ड खेळाडूचा समावेश असेल. संघ कॅप्ड खेळाडूंना अनकॅप्ड खेळाडू म्हणून ठेवू शकतात. मात्र यासाठी नियमही करण्यात आला आहे. गेल्या पाच वर्षांत एकही आंतरराष्ट्रीय सामना न खेळलेल्या खेळाडूंना अनकॅप्ड खेळाडू म्हणून कायम ठेवता येईल. या यादीत महेंद्रसिंग धोनीसह पियुष चावला, संदीप शर्मा आणि मोहित शर्माच्या नावाचा समावेश आहे. ज्यामुळे सीएसकेसह, राजस्थान रॉयल्स, मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स संघाला फायदा होणार आहे.

IND vs IRE Smriti Mandhana and Pratika Rawal 233 run partnership broke a 20 year old record against Ireland
IND vs IRE : स्मृती-प्रतिकाच्या द्विशतकी भागीदारीने केला मोठा पराक्रम! मोडला २० वर्षांपूर्वीचा ‘हा’ खास विक्रम
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
IND vs ENG T20I Series Full Schedule Timings and Squads in Detail
IND vs ENG: भारत वि इंग्लंड टी-२० मालिकेचं संपूर्ण वेळापत्रक एकाच क्लिकवर! जाणून घ्या सामन्याची नेमकी वेळ
Heinrich Klaasen hit maximum six ball gone out of stadium video viral in SAT20 2025
SA20 2025 : हेनरिक क्लासेनने मारला गगनचुंबी षटकार! चेंडू थेट स्टेडिमयच्या बाहेर रस्त्यावर पडला, अन् चाहत्याने…
BCCI New Rule Team India Players May Receive Performance based variable pay After Test Defeat
टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाविरूद्धचा पराभव पडणार भारी; थेट पगारावर परिणाम होणार? BCCI मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Anuj Rawat leave Delhi Team and join Gujarat Titans camp ahead IPL 2025 season
Anuj Rawat : आयपीएलला प्राधान्य देणे ‘या’ खेळाडूला पडणार महागात, गुजरात टायटन्ससाठी रणजी संघाची सोडली साथ
BCCI New Guidelines For Indian Players and Their Wife & Family after disastrous Australia series
BCCI ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर टीम इंडियाला लावणार शिस्त, खेळाडूंच्या कुटुंबासाठी नवीन नियम; पत्नी आणि गर्लफ्रेंड…
Kagiso Rabada create history first SA20 2025 Bowler to bowl 2 consecutive maiden overs in the powerplay
SA20 2025 : कगिसो रबाडाने घडवला इतिहास! अश्विन-चहलला मागे टाकत ‘हा’ पराक्रम करणारा जगातील पहिला गोलंदाज

सीएसकेसह कोणत्या तीन संघांना होणार फायदा –

वास्तविक, धोनी बराच काळ चेन्नई सुपर किंग्जमध्ये आहे आणि संघ त्याला सोडू इच्छित नाही. त्यामुळे त्याला पुन्हा एकदा कायम ठेवता येईल. मात्र तो अनकॅप्ड खेळाडू म्हणून खेळेल. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. या यादीत पियुष चावलाचेही नाव जोडले जाऊ शकते. चावलाला मुंबई इंडियन्स अनकॅप्ड खेळाडू म्हणून कायम ठेवू शकते. त्याने २०११ मध्ये भारतासाठी शेवटची वनडे आणि २०१२ मध्ये शेवटची कसोटी खेळली होती.

हेही वाचा – SL vs NZ : केन विल्यमसनने विराट कोहलीला मागे टाकत केला खास पराक्रम, ‘ही’ कामगिरी करणारा ठरला १९वा खेळाडू

तसेच राजस्थान रॉयल्स संदीप शर्माला कायम ठेवू शकते. संदीपने टीम इंडियासाठी फक्त २ टी-२० सामने खेळले आहेत. त्याने २०१५ मध्ये पदार्पण केले आणि त्याच वर्षी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामनाही खेळला. संदीपचा देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगला रेकॉर्ड आहे आणि त्याने आयपीएलमध्येही शानदार गोलंदाजी केली आहे. संदीपने १२६ आयपीएल सामन्यात १३७ विकेट्स घेतल्या आहेत. आणखी एक अनुभवी खेळाडू मोहित शर्माने गेल्या काही मोसमात गुजरात टायटन्सच्या यशात मोलाची भूमिका बजावली आहे. तो भारताकडून शेवटचा २०१५ मध्ये खेळला होता.

Story img Loader