IPL 2025 Retention Rahul Dravid on RR Retained RR Players list : आयपीएल २०२५ साठी सर्व १० संघांनी रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. राजस्थान रॉयल्सने ६ खेळाडूंना रिटेन केले असून ७९ कोटी रुपये खर्च केले आहेत. कर्णधार संजू सॅमसन आणि सलामीवीर यशस्वी जैस्वाल यांना प्रत्येकी १८ कोटी रुपये, रियान पराग, ध्रुव जुरेल आणि शिमरॉन हेटमायर यांना प्रत्येकी १४ कोटी रुपये दिले आहेत. त्याचबरोबर संदीप शर्माला ४ कोटी रुपये देऊन कायम ठेवले आहे. राजस्थानने युझवेंद्र चहल, आर अश्विन आणि जोस बटलर या खेळाडूंना रिटेन केले नाही, त्यामुळे सर्व चकित झाले आहेत. यावर राजस्थानचे नवे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी रिटेन्शन लिस्टबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रिटेन्शनमध्ये संजूची मोठी भूमिका –

राहुल द्रविड म्हणाले की, आरआरने कायम ठेवलेल्या खेळाडूंमध्ये सॅमसनची भूमिका महत्त्वाची आहे. रिटेन्शन लिस्ट जाहीर झाल्यानंतर राहुल द्रविड म्हणाले, “या रिटेन्शनमध्ये संजूची मोठी भूमिका होती. कारण त्यालाही अनेक अडचणींचा सामना करावा लागला. एक कर्णधार म्हणून त्याने या खेळाडूंशी खूप चांगले संबंध निर्माण केले आहेत. याचा आम्हाला खूप अभिमान आहे. आम्ही ज्या खेळाडूंना कायम ठेवू शकलो नाही, त्यांच्याबद्दल आम्हाला खूप दुःख आहे. संजू ५-६ वर्षांपासून या खेळाडूंसोबत काम करत आहे.”

राहुल द्रविड काय म्हणाले?

प्रशिक्षक पुढे म्हणाले, “त्यांचा या रिटेन्शनवर संतुलित दृष्टिकोन आहे. त्याने त्यातील गतिशीलता समजून घेण्याचा आणि त्याचे फायदे आणि तोटे समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्याने आमच्याशी खूप चर्चा केली आहे आणि हा निर्णय सोपा नव्हता. याबाबत आमच्यात खूप चर्चा झाली पण शेवटी आम्ही आमच्या रिटेन केलेल्या संघांतील खेळाडूंसह खूप आनंदी आहोत. आम्हाला जास्तीत जास्त खेळाडू रिटेन करायचे होते.” प्रत्येक संघाला जास्तीत जास्त ६ खेळाडू रिटेन करता येऊ शकत होते.

हेही वाचा – IND vs NZ : वॉशिंग्टन सुंदरने रचिन रवींद्रविरुद्ध नोंदवली हॅटट्रिक! सलग तिसऱ्या डावात उडवला त्रिफळा, VIDEO होतोय व्हायरल

युझवेंद्र चहल हा आयपीएल २०२४ मध्ये आरआरसाठी (१५ सामन्यांत १८ विकेट्स) दुसरा सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला होता. आयपीएल २०२३ मध्ये त्याने २१ विकेट घेतल्या होत्या. या काळात अश्विन चहलच्या सहाय्यक भूमिकेत राहिला. त्याच वेळी, इंग्लंडच्या मर्यादित षटकांच्या संघाचा कर्णधार असलेल्या बटलरने आयपीएलच्या मागील हंगामात ११ सामन्यांत १४०.७८ च्या स्ट्राइक रेटने ३५९ धावा केल्या होत्या. त्याने आयपीएल २०२३ मध्ये ३९२ आणि आयपीएल २०२२ मध्ये ८६३ धावा केल्या होत्या.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2025 retention sanju samson played big role in these rr retentions says coach rahul dravid why were chahal ashwin and butler released vbm