IPL 2025 Retention Sunrisers Hyderabad Team Players: ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने नेतृत्वाची धुरा हाती घेतल्यापासून सनरायझर्स हैदराबाद प्रचंड आक्रमक पवित्र्याने खेळत आहे. ट्रॅव्हिस हेड, हेनरिक क्लासेन आणि अभिषेक शर्मा यांनी अक्षरक्ष: धुमाकूळ घातला आहे. कमीत कमी चेंडू जास्तीत जास्त धावा चोपण्यात हे त्रिकुट माहीर आहे. कमिन्स, क्लासेन, हेड आणि अभिषेक शर्मा यांना रिटेन केलं आहे. हैदराबादकडे भुवनेश्वर कुमारसारखा अनुभवी गोलंदाज आहे, पण संघाने त्याच्यापेक्षा इतर खेळाडूंना रिटेन केलं आहे. पण त्याच्यासाठी राईट टू मॅच कार्डाचा उपयोग केला जाऊ शकतो. माजी कर्णधार एडन मारक्रमलाही संघाने रिलीज केलं आहे. मारक्रमच्या नेतृत्वातच SA T20 स्पर्धेत हैदराबाद संघाचे मालक असलेल्या संघानेच जेतेपदाची कमाई केली होती.
२०१६ मध्ये डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वात सनरायझर्स हैदराबादने जेतेपदावर नाव कोरलं होतं. अगदी आतापर्यंत वॉर्नर सनरायझर्सचा अविभाज्य भाग होता. मात्र वॉर्नर आणि सनरायझर्स यांच्यात वितुष्ट आल्याने सगळंच चित्र पालटलं. हैदराबाद संघाने वॉर्नरला सोडचिठ्ठी दिली. यानंतर पॅट कमिन्सकडे सूत्रं आली. त्याने संघाचा दृष्टिकोनच बदलून टाकला. हेड-क्लासेन-अभिषेक या त्रिकुटाने कमिन्सचे शब्द प्रत्यक्षात उतरवले.
SRH Retained Players: रिटेन केलेले खेळाडू
हेनरिक क्लासन – २३ कोटी
ट्रेव्हिस हेड – १४ कोटी
अभिषेक शर्मा – १४ कोटी
नितीश कुमार रेड्डी – ६ कोटी
रिलीज केलेले खेळाडू-
सनरायझर्स हैदराबाद- अब्दुल समद, मयांक अगरवाल, अनमोलप्रीत सिंग, एडन मारक्रम, राहुल त्रिपाठी, उपेंद्र यादव, मार्को यान्सन, ग्लेन फिलीप्स, सन्वीर सिंग, शाहबाझ अहमद, वॉशिंग्टन सुंदर, वानिंदू हासारंगा, आकाश सिंग, फझलक फरुकी, भुवनेश्वर कुमार, मयांक मार्कंडेय, टी.नटराजन, जातवेध सुब्रमण्यम, उमरान मलिक, जयदेव उनाडकत, विजयकांत वियासकांत