IPL 2025 : Rishabh Pant first choice in Delhi Capitals retention list : भारताचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतबद्दल बऱ्याच दिवसांपासून अशी अटकळ होती की, तो आयपीएल २०२५ मध्ये चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) मध्ये सामील होऊ शकतो. पंत दीर्घकाळापासून दिल्ली कॅपिटल्सचा (डीसी) भाग आहे. तो फ्रँचायझीचा कर्णधारही आहे. पंतने रविवारी भारत विरुद्ध बांगलादेश विरुद्धच्या पहिल्या कसोटीत शानदार शतक झळकावले. त्यानंतर एक मोठी अपडेट समोर आली आहे. दिल्ली कॅपिटल्स फ्रँचायझी ऋषभ पंतला रिलीज करणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. मेगा ऑक्शनपूर्वी तो रिटेंशनच्या यादीत अव्वल स्थानी असणार आहे.

ऋषभ पंतला दिल्ली कॅपिटल्स रिटेन करणार –

क्रिकबझच्या अहवालानुसार, पंतला दिल्ली कॅपिटल्सने रिटेन करण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे आता ऋषभला रिलीज केल्या जाण्याच्या अटकळांना पूर्णविराम लागला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) अद्याप खेळाडूंना रिटेन करण्याचे नियम जाहीर केलेले नाहीत. परंतु, दिल्ली कॅपिटल्सच्या सूत्रांनी सांगितले की, ऋषभ पंत दिल्ली कॅपिटल्सच्या रिटेंशनच्या यादीत टॉपवर असेल. विशेष म्हणजे ऋषभ पंत आणि दिल्ली कॅपिटल्सचे सहमालक पार्थ जिंदाल यांच्यात मुंबईत नुकत्याच झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला.

Rahul Gandhi And Arvind Kejriwal.
Delhi Election 2025 : काँग्रेसला हवी ‘आप’ची साथ, ‘हात’ मिळवण्यास केजरीवालांचा नकार
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Rohit Sharma Furious on Yashasvi Jaiswal Team Bus Leaves Without Him due to Indiscipline of India Opener
IND vs AUS: रोहित शर्मा यशस्वीवर वैतागला, जैस्वालला हॉटेलमध्येच सोडून गेली टीम बस; नेमकं काय घडलं?
Shabana Azmi
शबाना आझमी व जावेद अख्तर यांनी नाते संपवण्याचा घेतलेला निर्णय; खुलासा करीत म्हणाल्या, “आम्ही तीन महिने…”
Mumbai Railway Development Corporation floated tenders for constructing Chikhloli station between Ambernath and Badlapur
चिखलोली स्थानकाच्या उभारणीला गती, मुंबई रेल्वे विकास महामंडळाकडून दोन निविदा
bjp sujay patki
पहिली बाजू : आता महाराष्ट्र थांबणार नाही!
Rohit Sharma on Mohammed Shami Fitness and Comeback in Team for last 3 Test Against Australia
IND vs AUS: मोहम्मद शमीच्या पुनरागमनाबद्दल रोहित शर्माचं मोठं वक्तव्य, दुसऱ्या कसोटी पराभवानंतर नेमकं काय म्हणाला?
Sharad Pawar On Mahavikas Aghadi
Sharad Pawar : विधानसभेतील पराभवानंतर आता ‘मविआ’चं भविष्य काय? शरद पवारांनी सांगितली पुढची रणनीती

ऋषभ पंतचे आयपीएलमधील मानधन वाढणार?

ऋषभ पंतचे आयपीएलमधील मानधन सध्या १६ कोटी रुपये आहे. आता हा आकडा देखील वाढण्याची शक्यता आहे. पंत आयपीएल २०१९ पासून दिल्ली फ्रँचायझी (तत्कालीन दिल्ली डेअरडेव्हिल्स) साठी खेळत आहे. त्याने दिल्लीकडूनच आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. ऋषभ पंतचा आयपीएल २०२३ मध्ये कार अपघातामुळे खेळू शकला नव्हता. यानंतर त्याने आयपीएल २०२४ मध्ये दमदार पुनरागमन केले आणि त्याचा संघ गुणतालिकेत सहाव्या स्थानी राहिला. यानंतर स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये पुनरागमन केल्यापासून पंतने चांगली छाप पाडली आहे. फलंदाजीसोबतच तो विकेटच्या मागेही चांगली कामगिरी करत आहे.

हेही वाचा – IND vs BAN : विराटने दोन्ही डावात अपयशी ठरल्यानंतर सामन्यादरम्यानच सुरु केला सराव, नेटमधील VIDEO व्हायरल

दिल्ली कॅपिटल्स कोणाकोणाला रिटेन करणार?

क्रिकबझच्या अहवालानुसार, जर बीसीसीआयने पाचपेक्षा जास्त खेळाडूंना रिटेन करण्याचाी परवानगी दिली तर दिल्ली संघ अष्टपैलू अक्षर पटेल आणि फिरकी गोलंदाज कुलदीप यादव यांना रिटेन करु शकतो. तसेच ऑस्ट्रेलियाचा जेक फ्रेझर-मॅकगर्क आणि दक्षिण आफ्रिकेचा ट्रिस्टन स्टब्स यांना परदेशी खेळाडू म्हणून रिटेन करण्याची अपेक्षा आहे. याशिवाय, अनकॅप्ड खेळाडूंना कायम ठेवण्याचा नियम असेल तर दिल्ली सं २१ वर्षीय यष्टीरक्षक अभिषेक पोरेलसोबतही जाऊ शकतो.

Story img Loader