IPL 2025 Updates BCCI meeting with team owners : आयपीएल २०२५च्या पार्श्वभूमीवर संघमालक आणि बीसीसीआय यांच्यात झालेल्या बैठकीत अनेक मुद्यांवर मतभेद पाहायला मिळाले. मेगा ऑक्शन झालं तर सगळ्या संघांची रचनाच बदलून जाणार आहे. ते पाहता बीसीसीआयने आयपीएल संघमालकांशी संवाद साधला. मेगा ऑक्शन वर्षभर लांबणीवर टाकावं असाच बहुतांश संघमालकांचा विचार होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

शाहरुख खान आणि नेस वाडियांमध्ये मतभेद –

रिटेन्शन पॉलिसी अर्थात प्रत्येक संघाला किती खेळाडूंना राखता येणार यामुद्यावरून कोलकाता नाईट रायडर्स संघाचा सहमालक शाहरुख खान आणि पंजाब किंग्जचा सहमालक नेस वाडिया यांच्यात मतभेद दिसून आले. संघांना अधिकाअधिक खेळाडूंना आपल्याकडे राखता यावं असं शाहरुख खानचं मत होतं, तर पंजाबचे सहमालक नेस वाडिया यांच्या मते काही मोजक्या खेळाडूंनाच रिटेन केलं जावं. मेगा ऑक्शन होऊ नये असा सूर शाहरुख खानसह सनरायझर्स हैदराबादच्या सहमालक काव्या मारन यांचा होता. मेगा ऑक्शनऐवजी छोटे लिलाव आयोजित करण्यात यावेत असं काव्या यांचं म्हणणं होतं.

कारण संघाची मोट बांधण्यात प्रचंड वेळ, पैसा आणि ऊर्जा व्यतीत होतो. मेगा ऑक्शनमुळे संघाची नव्याने रचना करावी लागते. अभिषेक शर्माचं त्यांनी उदाहरण दिलं. अभिषेकला आम्ही तीन वर्षांपूर्वी ताफ्यात घेतलं. तेव्हा तो लहान होता. यंदाच्या हंगामात त्याने त्याची ताकद दाखवून दिली. खेळाडूला समजून घ्यायला, त्यांना फ्रँचाइजींची ध्येयधोरणं समजायलाही वेळ देणं गरजेचं आहे असं त्यांचं म्हणणं होतं. बहुतांश आयपीएल संघांनी अकादमी उभ्या केल्या आहेत. युवा खेळाडूंना हेरून त्यांच्या नैपुण्याला पैलू पाडण्यासाठी प्रशिक्षकांची फौज उपलब्ध असते. यावर मोठी गुंतवणूक संघांनी केली आहे. या अकादमीच्या माध्यमातून आयपीएल संघांना नवे खेळाडू मिळत आहेत.

हेही वाचा – IND vs SL 1st ODI : श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात भारताच्या खेळाडूंनी दंडाला का बांधली काळी पट्टी? जाणून घ्या कारण

इम्पॅक्ट प्लेयरच्या मुद्यावर पार्थ जिंदाल यांची थेट भूमिका –

दरम्यान इम्पॅक्ट प्लेयरच्या मुद्यावरून दिल्लीचे मालक पार्थ जिंदाल यांनी थेट भूमिका मांडली. ११ खेळाडूंमध्ये मुकाबला होणं आवश्यक आहे. अतिरिक्त गोलंदाज किंवा फलंदाज खेळवण्याने फार काही साधत नाही. यामुळे अष्टपैलू खेळाडूंची उपयुक्तताच संपुष्टात येते. अष्टपैलू खेळाडू अतिशय महत्त्वाचे आहेत. इम्पॅक्ट प्लेयर नियमामुळे काही खेळाडू बॉलिंगच करत नाहीत आणि काही बॅटिंगच करत नाहीत असंही दिसलं. भारतीय क्रिकेटसाठी हे चांगलं नाही. भारतीय संघाचा तसंच मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार रोहित शर्माही इम्पॅक्ट प्लेयर नियमाच्या बाजूने नाही.

हेही वाचा – Harbhajan Singh : ‘F चा अर्थ समजला की मी समजावून सांगू…’, पाकिस्तानी पत्रकारावर संतापला भज्जी, सुरक्षिततेबाबत दाखवला आरसा

बैठकीला कोणकोण उपस्थित होतं?

या बैठकीला दिल्ली कॅपिटल्सचे किरण कुमार ग्रंथी, लखनौ सुपरजायंट्से संजीव गोएंका, चेन्नई सुपर किंग्सच्या रुपा गुरुनाथ, राजस्थान रॉयल्सतर्फे मनोज बदाळे आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून प्रथमेश मिश्रा उपस्थित होते. काही संघमालक ऑनलाईन माध्यमातून बैठकीला उपस्थित होते. दरम्यान आयपीएल संघमालकांबरोबर विविध महत्त्वपूर्ण मुद्यांवर चांगली चर्चा झाली असं बीसीसीआयने जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. इम्पॅक्ट प्लेयर, मेगा ऑक्शन, रिटेन्शनयासह अन्य व्यावहारिक गोष्टींवर साधकबाधक चर्चा झाली. संघमालकांनी आपापली भूमिका मांडली, अभिप्राय दिला. या सूचना, अभिप्राय आयपीएल गव्हर्निंग काऊंसिलसमोर मांडण्यात येतील असं बीसीसीआयने म्हटलं आहे.