* ग्लेन मॅक्सवेलवर ५.३ कोटींची सर्वाधिक बोली
आयपीएलच्या सहाव्या पर्वासाठी खेळाडूंच्या लिलाव आज(रविवार) चेन्नई येथे करण्यात आला. यात आँस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलवर ५.३ कोटींची सर्वाधिक बोली लावत मुंबई इंडियन्सने ग्लेनला आपल्या संघात सामिल करून घेतले आहे. त्याचबरोबर यावेळेस रिकी पाँटींगही मुंबई इंडियन्स संघातून खेळेल. रिकी पाँटींगला २.१२ कोटीत मुंबई इंडियन्सने आपल्या संघासाठी खरेदी केले. तर आँस्ट्रेलियन कर्णधार मायकल क्लार्कला पुणे वॉरियर्सने २.१ कोटींत खरेदी केले. भारताच्या अभिषेक नायरवर ३ कोटींची सर्वाधिक बोली पुणे वॉरियर्स संघाकडून लावण्यात आली.