आयपीएलच्या सहाव्या पर्वासाठी आज(रविवार) चैन्नई येथे खेळाडूंच्या लिलावाला सुरूवात झाली. आंतराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती घेतलेला आँस्ट्रेलियन माजी कर्णधार रिकी पाँटींग आणि सध्याचा आँस्ट्रेलियन कर्णधार मायकल क्लार्क यांच्या लिलावाकडे सर्वांचे लक्ष केंद्रीत होते. रिकी पाँटिंगच्या लिलावाला सुरूवात होताचं आयपीएल मधील सर्व संघमालकांनी आपापल्या परिने बोली लावत रिकी पाँटींगला आपल्या संघात सामिल करून घेण्याचे प्रयत्न केले. पण सरते शेवटी मुंबई इंडियन्सने रिकी पाँटींगवर २.१२ कोटी अशी बोली लावत संघात सामिल करून घेतले आहे. या लिलावात आज एकूण १०८ खेळाडूंचा लिलाव होणार आहे. 

Story img Loader