आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या गेल्या मोसमातील स्पॉटफिक्सिंगचे प्रकरण ताजे असतानाच यंदाच्या आयपीएल स्पर्धेदरम्यान क्रिकेट बुकींनी दोन खेळाडुंशी संपर्क साधला असल्याची कबुली बीसीसीआयचे हंगामी अध्यक्ष सुनिल गावस्कर यांनी दिली. मात्र, बीसीसीआयने या संपूर्ण प्रकरणाची माहिती भ्रष्टाचार विरोधी आणि सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली असल्याचे गावस्कर यांनी सांगितले. आयपीएलच्या चेन्नई सुपर किंग्ज संघातील क्रिकेटपटू ब्रेन्डन मॅक्युलमशी क्रिकेट बुकींनी संपर्क साधल्याच्या प्रकरणाकडे गावस्कर यांचे लक्ष वेधले असता त्यांनी याबद्दल चिंता व्यक्त केली. मात्र, भ्रष्टाचार विरोधी आणि सुरक्षा विभागाचे अधिकारी आणि आयपीएलमधील खेळाडूंमधील चर्चेचा तपशील गुप्त राहील याची खात्री सुनिल गावस्कर यांनी दिली.
यावेळी पत्रकारांशी बोलताना आयपीएल स्पर्धेतील अंतर्गत चौकशीचे तपशील नक्की कशाप्रकारे बाहेर उघड होत आहेत याची माहिती आपल्याला नसल्याचे गावस्कर यांनी सांगितले. तसेच स्पर्धेतील गैरप्रकार रोखण्यासाठी खेळांडूना लगेच संवाद साधता येण्यासाठी आयपीएलमधील प्रत्येक संघाबरोबर यावेळी प्रत्येकी एका अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात असल्याची माहिती त्यांनी दिली.  

Story img Loader