मुंबईवर चार विकेट्सने विजय
प्रत्येक सामना हा नवा असतो, त्यामध्ये गेल्या सामन्याच्या विजयाचा किंवा पराभवाचा विचार करायचा नसतो, तर कामगिरीत सुधारणा करायची असते, हे बोल चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने पुन्हा एकदा खरे करून दाखवले आणि अटीतटीचा सामना शांत चित्ताने कसा जिंकायचा याचाही उत्तम वस्तुपाठ सादर केला. किंग्ज इलेव्हनविरुद्धच्या सामन्यापेक्षा या सामन्यात गोलंदाजी, क्षेत्ररक्षण आणि फलंदाजीमध्ये कमालीची सुधारणा करत चेन्नईने मुंबई इंडियन्सला चार विकेट्सने पराभूत केले. आर. अश्विनची फिरकी, सुरेश रैनाचे जबरदस्त क्षेत्ररक्षण,ड्वेन स्मिथचे अर्धशतक आणि धोनीच्या शानदार विजयी समाप्तीच्या जोरावर बाजी मारत मुंबईची विजयाची मालिका खंडीत केली. वानखेडेवर मुंबईने गेल्या १० सामन्यांमध्ये विजय मिळवला होता, पण अकरावा सामना त्यांच्यासाठी पराभवाचा ठरला. या पराभवामुळे मुंबईची विजयाची हॅट्ट्रिक हुकली आणि त्यांचे बाद फेरीत पोहोचण्याचे आव्हान अधिक खडतर बनले. मुंबईने प्रथम फलंदाजी करताना चेन्नईपुढे १५८ धावांचे आव्हान ठेवले होते आणि त्यांनी ते अखेरच्या षटकामध्ये पूर्ण केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा