यंदाच्या हंगामात धडपडत सुरुवात करणाऱ्या कोलकाताने सूर गवसल्यानंतर मात्र दिमाखदार विजयांची मालिकाच सुरू केली आहे. घरच्या मैदानावर बलाढय़ चेन्नईवर सहज विजय मिळवत कोलकाताने बाद फेरीच्या दिशेने दमदार आगेकूच केली आहे.
चेन्नईने दिलेल्या १५५ धावांचा पाठलाग करताना रॉबिन उथप्पाने अर्धशतकी खेळी साकारत कोलकाताच्या विजयाचा पाया रचला. उथप्पाने ३९ चेंडूत १० चौकार आणि एका षटकारासह ६७ धावांची खेळी केली. उथप्पा बाद झाल्यानंतर शकीब उल हसन आणि मनीष पांडे जोडीने २६ चेंडूत ५८ धावांची आक्रमक भागीदारी करत कोलकाताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. उथप्पालाच सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
तत्पूर्वी सुरेश रैनाच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर चेन्नईने १५४ धावा केल्या. भरवशाचा ड्वेन स्मिथ ५ धावा करून तंबूत परतला. सुनील नरिनने ब्रेंडान मॅक्क्युलमला २८ धावांवर बाद केले. यानंतर सुरेश रैनाने फॅफ डू प्लेसिसच्या साथीने तिसऱ्या विकेटसाठी ६२ धावांची भागीदारी केली. प्लेसिसने २३ धावा केल्या.
रैनाने आक्रमण आणि बचावाचा मेळ घालत ५२ चेंडूत ३ चौकार आणि ५ षटकारांसह ६५ धावांची खेळी केली. महेंद्रसिंग धोनीने १५ चेंडूत २१ धावा केल्या. कोलकातातर्फे पॅट कमिन्स, सुनील नरिन आणि पीयुष चावला यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.
संक्षिप्त धावफ लक :
चेन्नई सुपर किं ग्ज : २० षटकोंत ४ बाद १५४ (सुरेश रैना ६५, ब्रेंडान मॅक्क्युलम २८, सुनील नरिन १/२१) पराभूत विरुद्ध कोलकोता नाइट रायडर्स : १८ षटकोंत २ बाद १५६ (रॉबिन उथप्पा ६७, शकीब उल हसन ४६ , रवींद्र जडेजा १/२३)
सामनावीर : रॉबिन उथप्पा
कोलकोताचे जीतबो रे
यंदाच्या हंगामात धडपडत सुरुवात करणाऱ्या कोलकाताने सूर गवसल्यानंतर मात्र दिमाखदार विजयांची मालिकाच सुरू केली आहे.

First published on: 21-05-2014 at 01:23 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 7 csk lose in kolkatas eden