आंतरराष्ट्रीय स्तरावर धावांची टांकसाळ उघडणाऱ्या रॉयल चॅलेजर्स बंगळुरुचा कर्णधार विराट कोहली एकीकडे दिल्ली डेअरडेव्हिल्सविरुद्धच्या सलामीच्या लढतीसाठी उत्सुक असेल; तर दुसरीकडे पहिल्याच सामन्यामध्ये दिल्लीचा कर्णधार केव्हिन पीटरसन खेळू शकणार नसल्याने त्यांच्यापुढे बंगळुरुचे कडवे आव्हान असेल.
बंगळुरुचा संघ यंदाच्या पर्वात अधिक बलवान दिसत असला तरी त्यांच्याकडून लौकिकाला साजेशी कामगिरी होते का, हे पाहणे उत्सुकतेचे असेल. कोहलीबरोबर ख्रिस गेल आणि ए बी डी’व्हिलियर्ससारखे तडाखेबंद फलंदाज बंगळुरुच्या संघात आहेत, तर यंदाच्या मोसमात युवराज सिंगची त्यांच्या ताफ्यात आल्याने संघाची फलंदाजी अधिक बळकट होईल, तर अ‍ॅल्बी मॉर्केलसारखा दणकेबाज अष्टपैलू त्यांच्याकडे असेल. गोलंदाजीमध्ये मुथ्यय्या मुरलीधरन, रवी रामपॉल, मिचेल स्टार्क आणि वरुण आरोनसारखी आंतरराष्ट्रीय स्तरावरील गोलंदाजांची फळी संघाकडे आहे.
दिल्लीच्या संघाला पहिल्याच सामन्यात पीटरसन नसल्याने काहीसे कठीण जाणार असले तरी त्यांच्याकडेही एकापेक्षा एक दमदार खेळाडू आहेत. दिनेश कार्तिक, मुरली विजय, क्विंटन डि कॉक, रॉस टेलरसारखे फलंदाज संघाच्या दिमतीला आहेत. पण संघाची गोलंदाजी मात्र अनुनभवी वाटत आहे.
प्रतिस्पर्धी संघ :
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : विराट कोहली (कर्णधार), ख्रिस गेल, ए बी डी’व्हिलियर्स, युवराज सिंग, मिचेल स्टार्क, अ‍ॅल्बी मॉर्केल, वरुण आरोन, अशोक दिंडा, पार्थिव पटेल, मुथय्या मुरलीधरन, रवी रामपॉल, नीक मॅडिन्सन, हर्षल पटेल, विजय झोल, अबू नेचीम अहमद, सचिन राणा, शादाब जकाती, संदीप वॉरियर, तन्मय मिश्रा, यजुवेंद्रसिंग चहाल, योगेश ताकवले.
दिल्ली डेअरडेव्हिल्स : केव्हिन पीटरसन (कर्णधार), दिनेश कार्तिक, मुरली विजय, मोहम्मद शमी, नॅथन कल्टर-निले, क्विंटन डि कॉक, मनोज तिवारी, जयदेव उनाडकट, जे.पी.डय़ुमिनी, राहुल शर्मा, लक्ष्मी रतन शुक्ला, जिमी निशाम, सौरभ तिवारी, रॉस टेलर, केदार जाधव, मयांक अगरवाल, वेन पार्नेल, शाहबाज नदीम, सिद्धार्थ कौल, राहुल शुक्ला, एच.एस.शरथ, मिलिंदकुमार, जयंत यादव.

Story img Loader