तीन सलग मानहानीकारक पराभवांमुळे दिल्ली डेअरडेव्हिल्सचा संघ आयपीएल गुणतालिकेत तळाच्या स्थानावर आहे. परंतु आता आव्हान शाबूत ठेवण्यासाठी दिल्लीला उर्वरित सर्व सामने जिंकण्याची आवश्यकता आहे. शनिवारी दिल्लीची गाठ पडत आहे ती सनरायजर्स हैदराबादशी. आतापर्यंतच्या आठ सामन्यांपैकी फक्त दोन विजय मिळवू शकणाऱ्या दिल्ली डेअरडेव्हिल्सला बाद फेरीचे स्वप्न जिवंत राखण्यासाठी फक्त चमत्कारच तारू शकतो.
दिल्लीच्या खात्यावर जमा असलेले दोन विजय हे संयुक्त अरब अमिरातीमध्ये मिळवलेले आहेत. पण त्यानंतर फिरोझशाह कोटला स्टेडियमच्या घरच्या मैदानावर दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाची विजयासाठीची वणवण संपलेली नाही. या मैदानावर झालेल्या मागील तिन्ही सामन्यांत त्यांना विजय मिळवता आलेला नाही. पहिल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सकडून दिल्लीने सात विकेट्सने हार पत्करली. त्यानंतर अनुक्रमे चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाइट रायडर्स संघाकडून त्यांनी आठ विकेट्सने पराभव पत्करला.या पाश्र्वभूमीवर दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाचे मनोधर्य खचले आहे. परंतु उर्वरित सामन्यांमध्ये दमदार कामगिरी करून नशीब पालटण्याचे मनसुबे त्यांनी बाळगले आहेत. दिल्लीच्या फलंदाजीत जसा सातत्याचा अभाव आढळतो, तसाच गोलंदाजांनाही आपला प्रभाव पाडता आलेला नाही. मोहम्मद शमी, वेन पार्नेल, सिद्धार्थ कौल यांच्या कामगिरीचा परिणाम संघावर होत आहे. याचप्रमाणे ट्वेन्टी-२०मधील दिग्गज खेळाडू आणि कर्णधार केव्हिन पीटरसनसुद्धा धावांसाठी झगडत आहे. पीटरसनला पाच डावांमध्ये फक्त ६२ धावा करता आल्या आहेत. या साऱ्या गोष्टी दिल्लीसाठी चिंताजनक आहेत.
दिल्लीची वणवण संपेल? सनरायजर्स हैदराबादशी लढत
तीन सलग मानहानीकारक पराभवांमुळे दिल्ली डेअरडेव्हिल्सचा संघ आयपीएल गुणतालिकेत तळाच्या स्थानावर आहे. परंतु आता आव्हान शाबूत ठेवण्यासाठी दिल्लीला उर्वरित सर्व सामने जिंकण्याची आवश्यकता आहे.
First published on: 10-05-2014 at 12:18 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 7 down and out delhi daredevils face sunrisers hyderabad in must win situation