ट्वेन्टी-२० च्या युगात ए.बी.डिव्हिलियर्स आणि महेंद्रसिंग धोनी यांनी फलंदाजीचे रुपच पालटून ठेवले असल्याचे मत ‘आयपीएल’च्या पर्वात सातत्यपूर्व कामगिरी राहिलेल्या जे.पी.ड्युमिनी याने व्यक्त केले आहे.
ड्युमिनी म्हणतो की, “ए.बी.डिव्हिलियर्स आणि महेंद्रसिंग धोनी ट्वेन्टी-२० खेळाला खऱया अर्थाने कसे सामोरे जायचे हे शिकविले आहे. डिव्हिलियर्सने हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात खेळलेले फटके पाहता फलंदाजीच्या स्वरुपात किती वैविध्यता साधता येऊ शकते हे शिकता येईल. गोलंदाजांना नक्की काय हेरायचे असते हे जाणून घेण्यात डिव्हिलियर्स, धोनी हे दोघेही तरबेज आहेत.” असेही तो पुढे म्हणाला.
ड्युमिनीने आयपीएलच्या यापर्वात १३७ च्या फलंदाजी सरासरीने फलंदाजी केली आहे. डिव्हिलियर्सला प्रतिस्पर्धी समजण्यावर ड्युमिनीला विचारले असता, “मी डिव्हिलियर्सशी कधीच स्पर्धा करू शकत नाही. आम्ही दोघेही आपल्यापरिने चांगला खेळ व्हावा यासाठीच प्रयत्नशील असतो. आम्ही दोघेही मैदानावर आणि मैदानाबाहेर सुद्धा चांगले मित्र आहोत. १९ वर्षाखालील संघात खेळत असल्यापासून मी डिव्हिलियर्स सोबत उत्तम फलंदाजीचे क्षण अनुभवले आहेत.” असेही ड्युमिनी म्हणाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा