आयपीएलमध्ये शुक्रवारी डेव्हिड मिलरने किंग्ज इलेव्हन पंजाबच्या विजयात महत्त्वाची भूमिका निभावली. ग्लेन मॅक्सवेल आणि ख्रिस गेल या ट्वेन्टी-२०मधील तडाखेबंद फलंदाजांमधील द्वंद्व पाहण्यासाठी जमलेल्या क्रिकेटचाहत्यांना मिलरने वेगवान खेळीची खमंग मेजवानी दिली. मिलरच्या २९ चेंडूंतील ८ चौकार आणि ३ षटकारांसह ६६ धावांच्या खेळीच्या जोरावर किंग्ज इलेव्हन पंजाबने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर ३२ धावांनी मात केली. बंगळुरूने १६६ धावा केल्या. ए बी डी’व्हिलियर्सने एकाकी झुंज देत सर्वाधिक ५३ धावा केल्या.
संक्षिप्त धावफलक
किंग्ज इलेव्हन पंजाब : २० षटकांत ८ बाद १९८ (डेव्हिड मिलर ६६, वीरेंद्र सेहवाग ३०; युझवेंद्र चहल २/२३) विजयी विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : ९ बाद १६६ (ए बी डी’व्हिलियर्स ५३; संदीप शर्मा ३/२५)
सामनावीर : संदीप शर्मा.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा