जॅक कॅलिस, मनीष पांडे यांची अर्धशतकी खेळी आणि त्यांना गोलंदाजीत लाभलेली सुनील नरिनची साथ यामुळे २०१२ सालच्या विजेत्या कोलकाता नाईट रायडर्सने गतविजेत्या मुंबई इंडियन्सवर ४१ धावांनी विजय मिळवून आयपीएलच्या सातव्या पर्वात विजयी सलामी दिली.
कॅलिस आणि पांडे यांच्या धडाकेबाज खेळीमुळे कोलकाताने प्रथम फलंदाजी करताना १६३ धावा उभारल्या. हे उद्दिष्ट पेलताना मुंबईची सुरुवातीलाच दमछाक झाली. अनुभवी माईक हसी (३) आणि आदित्य तरे (२४) लवकरच बाद झाल्यानंतर कर्णधार रोहित शर्माने अंबाती रायुडूच्या साथीने मुंबईचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ६१ धावांची भागीदारी रचली. नरिनने मैदानावर स्थिरावलेल्या रायुडूला बाद केल्यानंतर मुंबईच्या विजयाच्या आशा मावळल्या. रायुडूने ४० चेंडूंत चार चौकारांसह ४८ धावांची खेळी केली. त्यानंतर मुंबईचे फलंदाज झटपट माघारी परतल्यामुळे गतविजेत्यांना पहिल्याच सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला.
तत्पूर्वी, कोलकाताने नाणेफक जिंकत फलंदाजीचा निर्णय स्वीकारला आणि जॅक कॅलिस आणि मनीष पांडे यांच्या अर्धशतकी खेळींच्या जोरावर संघाला १६३ धावा उभारून दिला. कॅलिस आणि पांडे यांनी दुसऱ्या विकेटसाठी १३१ धावांची भागीदारी रचत संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली. कॅलिसने ५ चौकार आणि ३ षटकारांच्या जोरावर ४६ चेंडूमध्ये ७२ धावांची अफलातून खेळी साकारली, तर पांडेने ६ चौकार आणि २ षटकारांच्या जोरावर ६४ धावांची खेळी साकारत कॅलिसला चांगली साथ दिली. मुंबईकडून लसिथ मलिंगाने भेदक मारा करत कोलकात्याच्या चार फलंदाजांना माघारी धाडले.
कोलकाताची विजयी सलामी
जॅक कॅलिस, मनीष पांडे यांची अर्धशतकी खेळी आणि त्यांना गोलंदाजीत लाभलेली सुनील नरिनची साथ यामुळे २०१२ सालच्या विजेत्या कोलकाता नाईट रायडर्सने
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 17-04-2014 at 04:50 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 7 kkr beat mumbai indians by 41 runs in ipl 7 opener