यंदाच्या आयपीएल हंगामात आश्चर्यकारक निकाल पाहायला मिळत असताना बलाढय़ संघही ढेपाळताना दिसत आहे. गेल्या वेळी दमदार कामगिरी करणाऱ्या कोलकाता नाइट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांना अद्यापही स्पर्धेत छाप पाडता आलेली नाही. आतापर्यंत चार सामन्यांपैकी दोन्ही संघांना दोन विजय मिळवता आले असून दोन्ही संघ तिसरा विजय मिळवण्यासाठी मंगळवारी एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत.
कोलकाताला अजूनही फलंदाजीमध्ये लय सापडलेली नाही. कर्णधार गौतम गंभीर, युसूफ पठाण यांना अद्यापही लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. गोलंदाजी हे त्यांचे प्रमुख अस्त्र असून सुनील नरीन आणि मॉर्ने मॉर्केलसारखे नावाजलेले गोलंदाज त्यांच्या ताफ्यामध्ये आहेत.
गेल्या सामन्यात राजस्थानने बंगळुरूसारख्या दिग्गज संघाची हवा काढून टाकली होती. राजस्थानच्या गोलंदाजीचा मारा भेदक होत असला तरी त्यांना फलंदाजीमध्ये सातत्य राखता आलेले नाही. अजिंक्य रहाणे आणि शेन वॉटसन यांच्यावर संघाची मुख्यत्वेकरून भिस्त असेल.
प्रतिस्पर्धी संघ
कोलकाता नाइट रायडर्स : गौतम गंभीर (कर्णधार), सुनील नरीन, जॅक कॅलिस, रॉबिन उथप्पा, युसूफ पठाण, शकिब-अल-हसन, उमेश यादव, विनय कुमार, मॉर्ने मॉर्केल, पियूष चावला, मनीष पांडे, वीर प्रताप सिंग, ख्रिस लीन, आंद्रे रसेल, एस.एस.मंडल, पॅट कमिन्स, देबब्रता दास, सूर्यकुमार यादव, मनविंदर बिस्ला, रायन टेन डोश्चटे आणि कुलदीप यादव.
राजस्थान रॉयल्स : शेन वॉटसन (कर्णधार), अभिषेक नायर, अजिंक्य रहाणे, अमित मिश्रा, केन रिचर्ड्सन, संजू सॅमसन, स्टिव्हन स्मिथ, टीम साऊथी, प्रवीण तांबे, अंकित शर्मा, अंकुश बैन्स, रजत भाटीया, स्टुअर्ट बिन्नी, उन्मुक्त चांद, केव्हॉन कुपर, बेन कटिंग, जेम्स फॉल्कनर, ब्रॅड हॉज, दीपक हुडा, इक्बाल अब्दुल्ला, धवल कुलकर्णी, विक्रमजित मलिक, करुण नायर, राहुल तेवेटीया आणि दीक्षान्त याज्ञिक.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विद्यार्थ्यांना मोफत तिकीटे
जमशेदपूर : विद्यार्थ्यांना क्रिकेटचे सामने बघता यावेत यासाठी झारखंड क्रिकेट असोसिएशनने एक अनोखी युक्ती शोधून काढली असून विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांनाही आयपीएलच्या तिकिटी मोफत देण्यात येणार आहे. २ मे रोजी रांचीच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर आयपीएलचा सामना होणार असून या सामन्याच्या पूर्वसंध्येला सुदैवी ५० विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना प्रत्येकी दोन तिकिटे देण्यात येणार आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 7 kolkata knight riders rajasthan royals look to outsmart each other