कोलकाता नाइट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात अनपेक्षित विजय मिळवत राजस्थान रॉयल्सचा संघ विजयाच्या वाटेवर परतला असून आता गुणतालिकेत आगेकूच करण्यासाठी सज्ज झाला आहे. सनरायजर्स हैदराबादविरुद्ध गुरुवारी दोन हात करण्यासाठी राजस्थानचा संघ सज्ज असून या सामन्यात त्यांचेच पारडे जड आहे. सात सामन्यांमध्ये राजस्थानने पाच विजयांसह तिसरे स्थान पटकावले आहे, तर हैदराबादला सहा सामन्यांमध्ये चार सामने गमवावे लागले आहेत.
कोलकाताविरुद्धच्या सामन्यात मुंबईकर प्रवीण तांबे आणि कर्णधार शेन वॉटसन यांनी नेत्रदीपक कामगिरी करत संघाला विजय मिळवून दिला होता. तांबे संघासाठी सोनेरी कामगिरी करत असून तो संघाचा हुकमी एक्का ठरत आहे. फलंदाजीमध्ये अजिंक्य रहाणे सातत्यपूर्ण कामगिरी करत असून करुण नायरही चांगली फलंदाजी करत आहे. त्याचबरोबर संजू सॅमसन, स्टुअर्ट बिन्नी आणि स्टिव्हन स्मिथसारखे खेळाडू चांगली कामगिरी करत आहेत.
शिखर धवनकडून नेतृत्व चांगेल होत नसून हीच संघासाठी चिंतेची बाब असेल. डेव्हिड वॉर्नर आणि आरोन फिंचसारखे आक्रमक फलंदाज त्यांच्याकडे आहेत. तर डेल स्टेन, भुवनेश्वर कुमार, डॅरेन सॅमी, इरफान पठाण आणि करण शर्मा असे गोलंदाजीचे पंचक त्यांच्याकडे आहे. नेतृत्व कणखर नसल्याने संघाला जास्त यश मिळू शकलेले नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा