इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)च्या नवव्या सत्राच्या लिलावात पीटरसन व इशांत शर्माला पुणे संघाने तर ७ कोटींची बोली लावून युवराजला सनरायजर्स हैदराबादने विकत घेतले. शनिवारी सकाळी ३५१ क्रिकेटपटूंच्या लिलावास सुरूवात झाली.  ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू शेन वॉट्सनला रॉयल चॅलेंजर्स बंगळूरने तब्बल ९.५ कोटी रुपये देऊन विकत घेतले आहे.
वेस्ट इंडिजचा ड्वेन स्मिथ दी गुजरात लायनस या संघाकडे गेला असून गुजरातने २ कोटी ३० लाखांची बोली ड्वेनसाठी लावली. सनरायजर्स हैदराबादने आशिष नेहराला ५.५ कोटी रुपयांना घेतले विकत  घेतले. चेतेश्वर पुजारा, हाशिम अमला, न्यूझीलंडचा मार्टिन गप्टिल, अॅरॉन फिन्चसाठी कोणीही बोली लावली नाही.
या मोसमासाठी सहा फ्रॅंचाईजी मिळून १०१ खेळाडू कायम राहिले आहेत. न्यायालयाच्या दणक्‍याने चेन्नई आणि राजस्थान फ्रॅंचाईजी दोन वर्षांसाठी निलंबित करण्यात आल्या असून, त्यांची जागी पुणे आणि राजकोट या दोन नव्या फ्रॅंचाईजी दोन वर्षांसाठी घेण्यात आल्या आहेत. नववा मोसम ९ एप्रिल ते २३ मे दरम्यान पार पडणार आहे.

Story img Loader