भारताचा ‘सिक्सर किंग’ युवराज सिंग याला मंगळवारी झालेल्या IPL Auction २०१९ मध्ये मुंबई इंडियन्सच्या संघाने १ कोटींच्या मूळ किमतीला विकत घेतले. पहिल्या फेरीत युवराजला विकत घेण्यात कोणीही रस दाखवला नव्हता. पण दुसऱ्या फेरीत मात्र युवराजला मुंबई इंडियन्सने विकत घेतले आणि आपल्या फलंदाजांच्या ताफ्याला अधिक बळ दिले.

युवराज मुंबईकर झाल्याचा आनंद प्रत्येक मुंबईकराला आणि क्रिकेटप्रेमीला झाला. यात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हादेखील मागे राहिला नाही. मुंबई इंडियन्स संघाची ओळख असलेल्या तेंडुलकरने २०१९च्या हंगामात युवराजची फटकेबाजी पाहण्यास उत्सुक असल्याचे ट्विट करून सांगितले. तसेच त्याने इतर खेळाडूंनाचे अभिनंदन केले आणि त्यांना शुभेच्छा दिल्या.

 

दरम्यान, युवराजनेही मुंबई संघाचे आभार मानले.

 

युवराज कारकीर्दीतील ऐन बहरात असताना एके काळी युवराजवर १६ कोटी रुपयांची बोली लागली होती. किंग्ज इलेव्हन पंजाबने त्याला विकत घेतले होते. पण त्यावेळी युवराजला आठ डावांमध्ये एकूण ६५ धावाच करता आल्याने पंजाब संघाने त्याला संघात स्थान न देण्याचा निर्णय घेतला होता.

Story img Loader