विश्वचषक क्रिकेट स्पर्धेमुळे परदेशी खेळाडूंच्या अनुपलब्धतेचे आव्हान
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
जयपूर : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटच्या आगामी हंगामासाठी मंगळवारी होणाऱ्या लिलावामध्ये सर्वच संघांपुढे विश्वचषकामुळे परदेशी खेळाडूंच्या अनुपलब्धतेचे प्रमुख आव्हान असेल. मात्र मूळ किंमत निम्म्यावर आणणाऱ्या युवराज सिंगला हे पथ्यावर पडण्याची शक्यता आहे.
कारकीर्दीतील ऐन बहरात असताना युवराजवर १६ कोटी रुपयांची बोली लागली होती. गेल्या वर्षी किंग्ज इलेव्हन पंजाबने त्याला त्याच्या दोन कोटी रुपये या मूळ किमतीलाच संघात स्थान दिले होते; परंतु युवराजला आठ डावांमध्ये एकूण ६५ धावाच करता आल्याने पंजाब संघाने त्याला संघात स्थान न देण्याचा निर्णय घेतला.
जून २०१७ मध्ये भारतीय संघातून अखेरचा सामना खेळलेल्या ३७ वर्षीय युवराजने आयपीएलमध्ये स्थान मिळण्याच्या उद्देशाने स्वत:ची मूळ किंमत एक कोटी केली. कारण युवराजला संघ मिळण्याबाबत क्रिकेटविश्वात साशंका प्रकट केली जात आहे. वृद्धिमान साहा, मोहम्मद शमी आणि अक्षर पटेल यांचीसुद्धा मूळ किंमत एक कोटी रुपयेच असणार आहे. भारताचे कसोटी क्रिकेटपटू चेतेश्वर पुजारा आणि इशांत शर्मा यांनी अनुक्रमे ५० आणि ७५ लाख रुपये मूळ किमतीला लिलावात सामील होण्याचे ठरवले आहे.
जयपूरमध्ये होणाऱ्या लिलावासाठी एकूण ३४६ खेळाडू उपलब्ध आहेत. मात्र दोन कोटी रुपये मूळ किंमत असलेल्या खेळाडूंमध्ये एकाही भारतीयाचा समावेश नाही. मात्र नऊ परदेशी खेळाडू यात समाविष्ट आहेत. या लिलावातून ७० खेळाडूंचे संघ निश्चित होऊ शकतील. यापैकी २० जागा परदेशी खेळाडूंसाठी उपलब्ध आहेत.
इंग्लंडमध्ये ३० मे ते १४ जुलै या कालावधीत होणाऱ्या विश्वचषकाच्या पाश्र्वभूमीवर अनेक संघांना अखेरच्या टप्प्यात परदेशी खेळाडू कमी उपलब्ध असतील. आरोन फिंच आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी यंदाच्या हंगामात न खेळण्याचा निर्णय घेतला आहे.
उपलब्ध खेळाडू (३४६)
* दोन कोटी मूळ किंमत (९)
ब्रेंडन मॅक्क्युलम, ख्रिस वोक्स, लसिथ मलिंगा, शॉन मार्श, सॅम कुरान, कॉलिन इनग्राम, कोरे अँडरसन, अँजेलो मॅथ्यूज, डी’आर्सी शार्ट.
* दीड कोटी मूळ किंमत (१०)
डेल स्टेन, मॉर्ने मॉर्केल, जॉनी बेअरस्टो, अॅलेक्स हेल्स, जयदेव उनाडकट, रिली रोसोऊ, ल्यूक राइट, जेम्स फॉकनर, अॅलेक्स कॅरी, लियाम डॉसन.
* एक कोटी मूळ किंमत (१९)
* ७५ लाख मूळ किंमत (१८)
* ५० लाख मूळ किंमत (६२)
* आंतरराष्ट्रीय प्रतिनिधित्व न केलेले (२२८)
वेळ : दुपारी ३.३० वा. ते ९.३० वा.
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट १