IPL 2019 च्या बाराव्या पर्वासाठी मंगळवारी लिलाव प्रक्रिया पार पडली. या लिलावामध्ये एकीकडे अनेक नवीन खेळाडूंनी कोटी कोटीची उड्डाणे घेतली, तर काही बड्या खेळाडूंना मात्र चांगलाच आर्थिक फटका बसला. रणजी, तामिळनाडू प्रीमियर लीग, भारताचा १७ आणि १९ वर्षाखालील संघात चमकदार कामगिरी करणाऱ्यांसाठी संघमालकांनी चांगली किंमत मोजल्याचे दिसले. IPL Auction 2019 मध्ये प्रत्येक संघाने विकत घेतलेले खेळाडू –
राजस्थान रॉयल्स
जयदेव उनाडकट (८ कोटी ४० लाख), वरुण एरॉन (२ कोटी ४० लाख), ओशेन थॉमस (१ कोटी १० लाख), लिअम लिविंगस्टोन (५० लाख), अॅश्टन टर्नर (५० लाख), शशांक सिंग (३० लाख), शुभम रांजणे (२० लाख), मनन वोहरा (२० लाख), रियान पराग (२० लाख)
—————————————
कोलकाता नाईट रायडर्स
कार्लोस ब्रेथवेट (५ कोटी), जो डेनली (१ कोटी), लॉकी फर्ग्युसन (१ कोटी ६० लाख), हॅरी गर्नी (७५ लाख), एनरिच नॉर्च (२० लाख), निखिल नाईक (२० लाख), पृथ्वी राज यार्रा (२० लाख), श्रीकांत मुंढे (२० लाख)
————————-
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
शिवम दुबे (५ कोटी), शिमरॉन हेटमायर (४ कोटी २० लाख), अक्षदीप नाथ सिंग (३ कोटी ६० लाख), प्रयास राय बर्मन (१ कोटी ५० लाख), हिम्मत सिंग (६५ लाख), हेन्रिच क्लासें (५० लाख), गुरकीरत सिंग (५० लाख), देवदत्त पडीकल (२० लाख), मिलिंद कुमार (२० लाख)
———————-
मुंबई इंडियन्स
बरिंदर सरन (३ कोटी ४० लाख), लसिथ मलिंगा (२ कोटी), युवराज सिंग (१ कोटी), अनमोलप्रीत सिंह (८० लाख), पंकज जैस्वाल (२० लाख), रसिक सलाम (२० लाख)
————————————
सनरायझर्स हैदराबाद
जॉनी बेअरस्टो (२ कोटी २० लाख), वृद्धिमान साहा (१ कोटी २० लाख), मार्टिन गप्टिल (१ कोटी)
————————————
किंग्ज इलेव्हन पंजाब
वरूण चक्रवर्ती (८ कोटी ४० लाख), सॅम करन (७ कोटी २० लाख), प्रभसिमरन सिंग (४ कोटी ८० लाख), मोहम्मद शमी (४ कोटी ८० लाख), निकोलस पूरन (४ कोटी २० लाख), मोजेस हेन्रीके (१ कोटी), हार्डस विल्ज्युन (७५ लाख), दर्शन नळकांडे (३० लाख), सर्फराज खान (२५ लाख), अर्शदीप सिंह (२० लाख), हरप्रीत ब्रार (२० लाख), अग्निवेश अयाची (२० लाख), मुरूगन अश्विन (२० लाख)
—————————–
दिल्ली कॅपिटल्स
कॉलिन इन्ग्राम (६ कोटी ४० लाख), अक्षर पटेल (५ कोटी), हनुमा विहारी (२ कोटी), ईशांत शर्मा (१ कोटी १० लाख), शरफेन रूदरफोर्ड (२ कोटी), किमो पॉल (५० लाख), जलज सक्सेना (२० लाख), बंडारू अय्यप्पा (२० लाख), अंकुश बेन्स (२० लाख), नथ्थू सिंग (२० लाख)
————————————–
चेन्नई सुपर किंग्ज
मोहित शर्मा (५ कोटी), ऋतुराज गायकवाड (२० लाख)
=========================