महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने या लिलावात नावनोंदणी केली आहे. मात्र पहिल्या सत्रातील लिलावानंतरही अर्जुनवर बोली लावण्यात आली. २० लाख रुपये त्याची मूळ किंमत म्हणजेच बेस प्राइज असणाऱ्या अर्जुनवर कोण बोली लावणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिलं आहे. मात्र बोली लागण्याआधीपासूनच अर्जुन तेंडुलकर सोशल नेटवर्कींगवर खास करुन ट्विटरवर चर्चेत आहे. अनेकांनी अर्जुनला सचिनचा मुलगा असल्याचा फायदा या लिलावामध्ये नक्की होईल असं मत व्यक्त केलं आहे. तर काहींनी अर्जुनला विकत घेण्यासाठी मुंबईने पहिल्या सत्रात कोणतीही मोठी बोली न लावल्याचं मत व्यक्त केलं आहे. जाणून घेऊयात कोणाचं नक्की काय म्हणणं आहे अर्जुनबद्दल…

१) लिलाव होण्याआधीच अर्जुनची चर्चा

२) तर करन अर्जुन एका टीममध्ये

३) मुंबई सोडून त्याला कोणी विकत घेतला तर

४) कोणाला विकत घेऊच देणार नाहीत

५) सीएसके विरुद्ध एमआय झालं पाहिजे

६) मग नेपोटीझम ट्रेण्ड होईल

७) लिलाव पाहताना अर्जुन

८) अर्जुनचं काय घेऊन बसलात

९) अर्जुनला तुफान किंमत मिळणार

१०) मुंबई करतेय बचत

११) याच्यावर पण खर्च करावा लागणार

१२) जोडी होईल

अर्जुनने फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्येच पोलीस आमंत्रण शिल्ड क्रिकेट स्पर्धेत अष्टपैलू क्षमतेची चुणूक दाखवून दिली होती. अर्जुनने एकाच षटकात ५ षटकार लगावत ३१ चेंडूत ७७ केल्या. तसेच तीन महत्वाचे बळीही मिळवले. त्याच्या बोलीवर यंदा सर्व चाहत्यांचे लक्ष असणार आहे.

Story img Loader