‘आयपीएल’चा १४वा मोसम एप्रिल महिन्यात देशातच होण्याची शक्यता अधिक असून या वेळी १६४ भारतीय, १२५ परदेशी आणि तीन संलग्न देशांतील खेळाडू लिलावात सहभागी होणार आहेत. संयुक्त अरब अमिरातीत झालेल्या १३व्या हंगामात मुंबई इंडियन्सने जेतेपद मिळवले होते. पुढील वर्षी १० संघ सहभागी होणार असल्याने यंदा मात्र छोटय़ा स्वरूपाच्या लिलावाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी दुपारी तीन वाजता लिलावाला सुरुवात होणार आहे.

या लिलावाच्या मैदानात अनेक दिग्गज खेळाडूंनी उडी घेतली आहे. डिसेंबर २०१९मध्ये झालेल्या लिलावात ऑस्ट्रेलियन खेळाडूंना चांगला भाव मिळाला होता. पॅट कमिन्स, ग्लेन मॅक्सवेल, आरोन फिंच या खेळाडूंना सर्वाधिक बोली लागली होती. परंतु ते आपल्या लौकिकानुसार कामगिरी करण्यात अपयशी ठरले. त्याशिवाय स्टिव्ह स्मिथची राजस्थान रॉयल्स संघातून हकालपट्टी करण्यात आल्याने यंदा मॅक्सवेलसह, स्मिथ, फिंच या खेळाडूंना कोणता संघ संधी देणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. त्याशिवाय इंग्लंडचा धडेकाबाज फलंदाज डेव्हिड मलान, मोईन अली यांनादेखील मोठी बोली लागण्याची शक्यता आहे.

आयपीएल लिलावाच्या इतिहासात युवराज सिंह सर्वात महागडा खेळाडू ठरलेला आहे. आतापर्यंत युवराजला मिळालेली किंमत एकाही खेळाडूला मिळाली नाही. यंदा युवराजनं केलला विक्रम कोण मोडीत काढतेय, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. पाहूयात आयपीएलच्या इहिसातील सर्वात महागडे खेळाडू….

१ ) युवराज सिंह –
भारतीय संघाचा माजी विस्फोटक फलंदाजाला २०१५ मधील लिलावात १६ कोटी रुपयांची बोली लागली होती. आयपीएलच्या इतिहासातील ही सर्वातम मोठी बोली आहे. युवराजला दिल्लीनं १६ कोटी रुपयांत विकत घेतलं होतं.

२) पॅट कमिन्स –
ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स आयपीएलच्या लिलावात सर्वात महागडा वेगवान गोलंदाज ठरलेला आहे. कमिन्सनं बेन स्टोक्सला मागे टाकलं. २०२० मध्ये कमिन्सला १५ कोटी ५ लाख रुपयांना कोलकातानं खरेदी केलं होतं.

३) इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्लाला २०१७ मध्ये १४.५ कोटी रुपयांमध्ये खरेदी केलं होतं.

४) २०१४ मध्ये युवराजला आरसीबीनं १४ कोटी रुपयांत खरेदी केलं होतं.

५) २०१८ मध्ये बेन स्टोक्सला राजस्थान रॉयल्स संघानं १२.५ कोटी रुपयांना खरेदी केलं आहे.