दक्षिण आफ्रिकेच्या ख्रिस मॉरिसनं गुरुवारी झालेल्या आयपीएलच्या १४ व्या हंगामासाठीच्या लिलावप्रक्रियेत विक्रमी झेप घेतली. आजवरच्या आयपीएल इतिहासातील सर्वाधिक महागडा खेळाडू ठरण्याचा मान मिळालेल्या मॉरिससाठी राजस्थान संघानं १६ कोटी २५ लाख रुपयांची बोली लावली. याशिवाय ग्लेन मॅक्सवेल, कायले जेमिसन, जाये रिचर्डसन या विदेशी खेळाडूंनीसुद्धा कोट्यवधींची उड्डानं घेतली. चेन्नईतील हॉटेल आयटीसी ग्रँड छोला येथे झालेल्या लिलावाच्या रणधुमाळीत अष्टपैलू खेळाडूंचं वर्चस्व दिसून आलं. यामध्ये दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या खेळाडूंना संघमालकांनी प्राधान्य दिलं. पाहूयात कोण्याती संघानं कोणाला पसंती दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लिलावात बोली लागलेले खेळाडू –
राजस्थान रॉयल्स –
ख्रिस मॉरिस, शिवम दुबे, मुस्तफिजूर रहमान, लिआम लिव्हंगस्टोन, कुलदिप यादव, के.सी. करिअप्पा, आकाश सिंग, चेतन साकारिया.

रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरु –
ग्लेन मॅक्सवेल, कायले जेमिसन, मोहम्म अझरुद्दीन, डॅन ख्रिस्टियन, सचिन बेबी, सुय़स प्रभुदेसाई, के. एस. भरत, रजत पाटिदार

पंजाब किंग्ज –
जाय रिचर्डसन, रायले मॅरेडिथ, मोझेस हेन्रिक्स, डेव्हिड मलान, शाहरुख खान, सौरभ कुमार, उत्कर्ष सिंग, फॅबिअन अॅलन, जलज सक्सेना

चेन्नई सुपर किंग्ज –
मोईन अली, कृष्णप्पा गौतम, चेतेश्वर पुजारा, सी. हरी निशांत, एम. हरिशंकर रेड्डी, के. वर्मा

मुंबई इंडियन्स –
अर्जुन तेंडुलकर, अॅडम मिल्ने, नॅथन कोल्टर नाइल, पियुष चावला, जिमी निशम, युधवीर चरक, मार्को जान्सेन

दिल्ली कॅपिटल्स –
स्टीव्ह स्मिथ, सॅम बिलिंग्ज, टॉम करन, रिपल पटेल, विष्णू विनोद, उमेश यादव, लुकमन मेरिवाल, एम. सिद्धार्थ

सनरायजर्स हैदराबाद –
मुजीब उर रेहमान, केदार जाधव, जगदीश सुचिथ

कोलकाता नाइट रायडर्स –
शाकिब अल हसन, हरभजन सिंग, बेन कटिंग, पवन नेगी, शेल्डन जॅक्सन, वैभव अरोरा, करुण नाय, व्यंकटेश अय्यर

मराठीतील सर्व आयपीएल २०२१ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl auction 2021 steve smith arjun tendulkar david malan nck
Show comments