इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) १५ व्या हंगामासाठी नुकताच महालिलाव पार पडला. या दोन दिवसीय महालिलावामध्ये १५ देशांचे ६०० खेळाडू सहभागी झाले होते. वेगवेगळ्या देशांच्या खेळाडूंना अगदी कोट्यावधीची बोली लावून संघ मालकांनी आपल्या संघात स्थान दिल्याचं यंदाच्या लिलावामध्ये पहायला मिळालं. मात्र या लिलावामध्ये पाकिस्तानी खेळाडूंचा समावेश नव्हता. मागील अनेक वर्षांपासून आयपीएलमध्ये पाकिस्तानी खेळाडूंवर बंदी आहे. तरीही जर पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीला किती बोली मिळाली असती याबद्दल पाकिस्तानच्या एका पत्रकाराने व्यक्त केलेलं मत सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालंय.
नक्की पाहा >> Photos: ‘टेनिस बॉल क्रिकेटचा सुपरस्टार’ अगदी शेवटच्या क्षणी आर्यन, सुहानामुळे KKR च्या संघात; पण तो आहे तरी कोण?
२००९ च्या आयपीएल पर्वानंतर इंडियन प्रीमियर लीगमध्ये पाकिस्तानी खेळाडूंवर बंदी घालण्यात आलीय. मात्र दर आयपीएल लिलावाच्यानंतर पाकिस्तानी खेळाडूंची चर्चा होतानाचं चित्र पहायला मिळतं. अनेकदा पाकिस्तानचा हा खेळाडू असता तर एवढे कोटी मिळाले असते तो असता तर एवढी रक्कम मिलाली असती अशी वक्तव्य पाकिस्तानचे माजी खेळाडू आणि पत्रकांकडून केली जाते. असच एक वक्तव्य आता पाकिस्तानमधील पत्रकार इत्साम उल हकने केलंय. सध्या त्याचं हे वक्तव्य सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत असून भारतीय त्याला ट्रोल करतायत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा