आयपीएलच्या सोळाव्या हंगामाचा लिलाव शुक्रवारी कोची येथे पार पडल. या लिलावात सॅम करन, कॅमरुन ग्रीन आणि बेन स्टोक्ससारखे खेळाडू सर्वात महागडे ठरले आहेत. त्याबरोबर ज्या खेळाडूंचे अगोदर नाव कोणाला माहित नव्हते, अशा खेळाडूंची देखील चांदी झाली आहे. त्यापैकी एक म्हणजे अब्दुल बसिथ.ज्याच्यावर राजस्थान रॉयल्सने विश्वास दाखवत, २० लाख रुपये खर्च करुन आपल्या ताफ्यात सामील केले.
कोण आहे अब्दुल बसिथ –
अष्टपैलू अब्दुल बसिथ हा देशांतर्गत क्रिकेटमध्ये केरळसाठी खेळतो. त्याचे वडील केरळ परिवहन महामंडळामध्ये बसचालक आहेत. तो एर्नाकुलम या लहानशा गावातून अब्दुलने आपल्या क्रिकेट करिअरची सुरुवात केली होती. जेव्हा अब्दुलला आरआर संघाने २० लाख रुपयांत खरेदी केले, तेव्हा त्याचे आई-वडील टी.व्ही.समोर बसून होते. त्यावेळी तो बाहेर गेला होता. त्यानंतर त्यामुळे, वडिलांनी अब्दुल घरात येण्यापूर्वीच केक आणून ठेवला होता. अब्दुल घरी येताच त्याचे स्वागत करुन केक कापण्यात आला.
राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार संजू सॅमसन देखील केरळचा खेळाडू आहे. त्यामुळे दोन केरळवासी खेळाडू राजस्थान संघासाठी खांद्याला खांदा लावून खेळताना दिसणार आहे. अब्दुल बसिथला संजू सॅमसन जवळून ओळखतो. कारण दोघे केरळ संघासाठी एकत्र खेळतात. अब्दुल बसिथ हा एक गेमचेंजर खेळाडू आहे. त्यामुळे त्याला राजस्थान संघासाठी खेळण्याची संधी मिळाली आहे.
लिलावात विकत घेतलेले खेळाडू –
जो रूट (१ कोटी), अब्दुल बासिथ (२० लाख), आकाश वशिष्ठ (२० लाख), एम अश्विन (२० लाख), केएम आसिफ (३० लाख), अॅडम झाम्पा (३० लाख), कुणाल राठौर (२० लाख), डोनोवन फरेरा (२० लाख) आणि जेसन होल्डर (५.७५ कोटी) या खेळाडूंचा समावेश आहे.