इंडियन प्रीमियर लीगच्या १६व्या हंगामासाठी शुक्रवारी कोची येथे लिला मिनी-लिलाव पार पडला. या लिलाव प्रक्रियेत इंग्लंडच्या काही खेळाडूंनी कोट्यवधी रुपये मिळवले. सनरायझर्स हैदराबादशी संबंधित हॅरी ब्रूक हा त्या खेळाडूंपैकी एक आहे. सनरायझर्स हैदराबादने ब्रूकला विकत घेण्यासाठी सर्वात मोठी बोली लावली. एसएरएचने त्याला १३.२५ कोटी रुपयांना खरेदी केले. आयपीएल फ्रँचायझी हैदराबादने विकत घेतल्यानंतर हॅरी ब्रूकची प्रतिक्रिया आली आहे.
हॅरी ब्रूकची मूळ किंमत १.५० कोटी रुपये होती. लिलावात त्याचे नाव आल्यावर राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात बोलीचे युद्ध सुरू झाले. त्यानंतर आरसीबीने माघार घेतली. त्यानेतर सनरायझर्स हैदराबादने त्याला आपल्या संघात सामील करून घेतले.
लिलावात बोली लागल्यानंतर त्याच्या आई आणि आजीच्या डोळ्यात अश्रू आल्याचे ब्रूकने सांगितले. ब्रुक म्हणाला, “मला कसे प्रतिक्रिया द्यायची हे माहित नाही. माझ्याकडे सांगायला शब्द नाहीत. मी माझ्या आई आणि आजीसोबत नाश्ता करत होतो. जेव्हा सनरायझर्स हैदराबादने आयपीएल लिलावात मला खरेदी केले गेले, तेव्हा ते रडू लागले.”
सनरायझर्स हैदराबादने हॅरी ब्रूक्सचा त्यांच्या संघात समावेश केला आहे, परंतु त्यांना त्यांच्या गोलंदाजीची फळी स्थिर करण्यासाठी खेळाडू खरेदी करण्याची गरज होती. सनरायझर्स हैदराबादने हॅरी ब्रूक (रु. १३.२५ कोटी), मयंक अग्रवाल (८.२५ कोटी) आणि हेनरिक क्लासेन (५.२५ कोटी) यांना खरेदी केले.
हेही वाचा – BBL: मॅथ्यू वेडवर एका सामन्याची बंदी; त्याच्या जागी ‘हा’ खेळाडू करणार संघात पुनरागमन
हैदराबाद संघाकडे ४२ कोटी रुपये होते. त्यापैकी २० कोटी रुपयात त्यांनी ब्रुक आणि मयंक अग्रवाल खरेदी केले. अग्रवाल सध्या गेल्या मोसमात पंजाब संघाचा कर्णधार होता. त्यामुळे तो हैदराबादसाठी कर्णधाराची भूमिका देखील पार पाडू शकतो. अनेकजण ब्रूकचा उल्लेख ‘इंग्लंडचा विराट कोहली’ म्हणून करतात.इंग्लंडचा कसोटी कर्णधार बेन स्टोक्सनेही त्याची तुलना विराट कोहलीशी केली होती.