IPL Mini Auction 2023 Players List: आयपीएल २०२३ मिनी लिलावात जम्मू आणि काश्मीरचा अष्टपैलू खेळाडू विवरांत शर्माला मोठी बोली लागली आहे. त्याला सनरायझर्स हैदराबादने २.६० कोटींना विकत घेतले आहे. २३ वर्षीय विव्रतला आतापर्यंत कोणी ओळखत नव्हते, पण कोलकाता आणि हैदराबादचे संघ त्याच्यावर करोडो रुपये खर्च करण्यास तयार होते. शेवटी हैदराबादने बाजी मारली आणि या फिरकी अष्टपैलू खेळाडूचा आपल्या संघात समावेश केला.
विवरांतने देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपला ठसा कसा उमटवला आणि मिनी ऑक्शनमध्ये तो करोडपती झाला. विवरांत हा डाव्या हाताचा फलंदाज आहे. तो आपल्या संघासाठी डावाची सलामी देतो आणि मोठी खेळी खेळण्यात माहिर आहे. यासोबतच तो लेगस्पिन गोलंदाजीही करतो. गेल्या वर्षी तो हैदराबाद संघाचा नेट गोलंदाज होता आणि अब्दुल समदने त्याचे नाव पुढे केले होते. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये तो खूप उपयुक्त खेळाडू आहे. त्यामुळे हैदराबादने त्याला मोठी रक्कम देऊन खरेदी केले.
विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतील कामगिरी –
१३ पट किंमतीला विकल्या गेलेल्या विवरांत शर्माने यंदाच्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये, आपल्या अष्टपैलू कामगिरीने सर्वांना प्रभावित केले होते. त्याने जम्मू-काश्मीरसाठी आठ सामन्यांच्या आठ डावांत ३९५ धावा केल्या आहेत. यामध्ये उत्तराखंडविरुद्धच्या नाबाद १५४ धावांचाही समावेश आहे. या मोसमात त्याच्या बॅटमधून एक शतक आणि दोन अर्धशतकं झळकली. त्याची सरासरी ५६.५२ आणि स्ट्राईक रेट ९४.७२ होता. या मोसमात त्याच्या बॅटमधून ५० चौकार आणि ११ षटकार निघालेत.
विवरांतची प्रथम श्रेणी क्रिकेटमधील कामगिरी –
हेही वाचा – IPL Auction 2023: बॅटने फ्लॉप तरीही ‘हा’ कॅरेबियन खेळाडू आयपीएलमध्ये झाला मालामाल
विवरांतने आतापर्यंत दोन प्रथम श्रेणी सामन्यांच्या चार डावात ७६ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर १४ लिस्ट ए सामन्यांमध्ये त्याच्या ५१९ धावा आहेत. या फॉरमॅटमध्ये त्याने एक शतक आणि तीन अर्धशतके झळकावली आहेत. त्याने नऊ टी-२० सामन्यांच्या आठ डावात १९१ धावा केल्या आहेत. या फॉरमॅटमध्ये त्याचा स्ट्राइक रेट १२८.१८ राहिला आहे.