IPL Auction 2024, Pat Cummins: आयपीएल २०२४ लिलाव संपून जवळपास एक आठवडा झाला आहे, परंतु ऑस्ट्रेलियन गोलंदाज पॅट कमिन्स आणि मिचेल स्टार्क अजूनही चर्चेत आहेत. अनेकांनी या जोडीला मोठी रक्कम मिळेल असे जरी भाकीत केले असले तरी, दोघांना प्रत्येकी २० कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम मिळेल असे कोणीही कधीच विचार केला नसेल.भारताचा माजी सलामीवीर आकाश चोप्रा या दोन्ही खरेदीबद्दल अनेकदा बोलला आहे आणि त्याच्या युट्यूब चॅनेलवरील अलीकडील व्हिडीओमध्ये त्याने आरसीबी कमिन्सला कसे रोखू शकले नाही हे स्पष्ट केले. आयपीएल २०२४च्या लिलावात प्रवेश करताना संघाकडे केवळ २३.२५ कोटी रुपये होते.

आकाश चोप्रा म्हणाला, “लिलावात हैदराबादने पूर्णपणे ठरवले आहे की त्यांना पॅट कमिन्स कोणत्याही किंमतीत हवा आहे आणि ते त्याच्यासाठी बोली लावत राहतील. प्रकरण जेव्हा २० कोटींपर्यंत पोहोचले तेव्हा मी हात जोडून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला म्हणालो, थोडा विचार करा. जर तुम्हाला पॅट कमिन्स २० कोटी रुपये खर्चकरून घेतला असता तर त्याने दोन्ही बाजूने गोलंदाजी केली असती का? कारण, तुमच्याकडे फक्त २३.२५ कोटी रुपये पर्स मध्ये होते.”

हेही वाचा: Usman Khawaja: ICCने विरोध करूनही उस्मान ख्वाजा काळी पट्टी बांधण्यावर ठाम; म्हणाला, “शोक व्यक्त…”

आरसीबीने जर पॅट कमिन्सला विकत घेतले असते तर तोटा झाला असता आकाश चोप्रा

माजी भारतीय सलामीवीर आकाश चोप्रा पुढे म्हणाला, “आरसीबीमध्ये कमिन्सचा समावेश केल्यास त्यांचे आक्रमण मजबूत होईल. जर त्यांनी पॅट कमिन्सला खरेदी केले असते, तर हैदराबाद त्या टप्प्यावर कोसळला असता आणि त्यांनी त्याला २० कोटी रुपयांना विकत घेतले नसते आणि त्यांचा संघ अत्यंत कमकुवत झाला असता. जेव्हा तुम्ही इतके खेळाडू सोडले आणि पॅट कमिन्सची निवड एका छोट्या चिन्नास्वामी मैदानावर सपाट खेळपट्टीवर केली असती तेव्हा, आरसीबीचे मोठे नुकसान झाले असते. संघ मजबूत फक्त कागदावर दिसत असला असता.”

चोप्रा पुढे म्हणाला, “हैदराबादला मेरी ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा कार्ड पाठवा कारण, त्यांनी तुम्हाला (आरसीबी) वाचवले आहे. हैदराबाद या बोलीतून बाहेर पडले नाहीत आणि तुम्ही वाचलात. हे पाहणे खूप मनोरंजक होते की त्यांना पॅट कमिन्स कुठल्याही परिस्थितीत हवा होता परंतु, त्यांनी हुशार होऊन जेराल्ड कोएत्झी आणि मिचेल स्टार्कसाठी बोली लावली नाही. अखेरीस, हर्षल पटेल आणि वानिंदू हसरंगा सारख्या खेळाडूंना सोडल्यानंतर, आरसीबीने वेस्ट इंडियन अल्झारी जोसेफला ११.५० कोटी रुपयांना विकत घेतले. त्यांनी यश दयाल यांना ५ कोटी, टॉम करन (१.५ कोटी) आणि लॉकी फर्ग्युसन (२ कोटी) यांना खरेदी केले. आरसीबी भाग्यवान आहे की पीट कमिन्सला विकत घेतले नाही आणि हैदरबादने त्याला विकत घेतले.”

हेही वाचा: IND W vs AUS W: रिचा घोषचा अफलातून थ्रो अन् बेथ मुनी धावबाद, तिसऱ्या दिवसअखेर टीम इंडिया मजबूत स्थितीत; पाहा Video

इंडियन प्रीमियर लीग २०२४ साठी खेळाडूंचा लिलाव झाला. हा एक छोटा लिलाव होता आणि बहुतेक संघांकडे त्यांचे प्रमुख खेळाडू आधीच होते. अशा परिस्थितीत भारताचे मोठे खेळाडू या लिलावाचा भाग नव्हते. यामुळे परदेशी खेळाडूंचा संपूर्ण लिलावात बोलबाला होता. मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्स हे दोन ऑस्ट्रेलियन खेळाडू आकर्षणाचे केंद्र होते. सर्वप्रथम, लिलावात २० कोटींचा टप्पा पार करणारा पॅट कमिन्स आयपीएल इतिहासातील पहिला खेळाडू ठरला. सनरायझर्स हैदराबादने त्याला २०.५० कोटी रुपयांना खरेदी केले. यानंतर मिचेल स्टार्कला कोलकाता नाईट रायडर्सने २४.७५ कोटी रुपयांना विकत घेतले.

Story img Loader